IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांत गारद, तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात एक बाद 14 रन
मयंक अग्रवाल (Photo Credit: Getty Images)

IND v NZ, 1st Test Day 3: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) कानपूरच्या (Kanpur) ग्रीन पार्क स्टेडियमवर दिवसाखेर एक बाद धावा 14 केल्या आहेत. दिवसाचा खेळ पुन्हा एकदा वेळापूर्वी खराब प्रकाशामुळे संपुष्टात आला तेव्हा मयंक अग्रवाल 4 धावा आणि चेतेश्वर पुजारा 9 धावा करून नाबाद खेळत होते. काईल जेमीसन (Kyle Jamieson) दिवसाखेरीस संघासाठी शुभमन गिलची एकमात्र विकेट घेतली. भारताने आता आपली आघाडी 63 धावांपर्यंत नेली आहे. तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांच्या शानदार शो ने किवी संघाला आघाडी घेण्यापासून रोखले. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 345 धावांच्या प्रत्युत्तरात ब्लॅककॅप्स 296 धावाच करू शकले. किवींसाठी टॉम लॅथमने 95 धावा आणि विल यंगने 89 धावा केल्या. तर जेमीसनने झुंजार 23 धावा केल्या. दुसरीकडे अक्षर पटेल, आर अश्विन आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी किवी खेळाडूंना गुडघे टेकण्यास भाग पाडले. पटेलने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तसेच अश्विनने तीन गडी बाद केले. (IND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत Axar पटेल याच्या प्रभावी 5, न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांवर गारद)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग यांनी 129 धावांपुढे खेळायला सुरुवात केली. सावध फलंदाजी करत दोन्ही फलंदाजांनी संघाची धावसंख्या बिनबाद 150 धावांपर्यंत नेली असताना अश्विनने यंगला बाद करून संघाच्या पदरी पहिली विकेट टाकली. इथं पासून न्यूझीलंडला फलंदाजांची कर्म गडगडण्यास सुरुवात झाली. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्यासारखे दिग्गज कसोटी फलंदाज देखील तग धरून खेळू शकले नाही. विल्यमसन 18 तर टेलर 11 धावाच करू शकला. हेन्री निकोल्स 2 धाव करून बाद झाला. भारतीय गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत असल्याचा फटका किवी संघाला बसला. अखेरीस तळ ठोकून शतकाकडे वाटचाल करणाऱ्या लॅथमला अक्षरने चकवले आणि बदली विकेटकीपर श्रीकर भरतने त्याला यष्टीचीत केले. लॅथम 282 चेंडूंत 10 चौकारांसह 95 धावा करून तंबूत परतला. किवी डावात भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने लॅथम वगळता टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल आणि टिम साउदी यांच्या विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा पाच विकेट खिशात घातल्या.

यापूर्वी नवोदित श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 300 हून अधिक धावांचा टप्पा गाठला. इतर दोन फलंदाज शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतक झळकावले. भारताच्या पहिल्या डावात प्रत्युत्तरात सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम यांनी किवींना चांगली सुरुवात करून दिली. मात्र अनुभवी फलंदाजांच्या अपयशामुळे न्यूझीलंड संघ 49 धावांची पिछाडीवर पडला. पाहुण्या संघासाठी साउदीने पाच विकेट घेतल्या.