IND vs ENG: ‘इंग्लंड-इंग्लिश मीडिया आतापासून अ‍ॅशेसमध्ये मग्न झाला आहे आणि भारत...’ या दिग्गज खेळाडूने ब्रिटिशांना मारले टोमणे
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या (Team India) संघाला कमी लेखल्यानंतर इंग्लंडला (England) मालिकेतील निर्णायक सामन्यात मँचेस्टर येथे कडव्या आव्हानाचा सामना करावा लागेल असा विश्वास महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी व्यक्त केला आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध भाष्यकारांपैकी एक, माजी दिग्गज भारतीय फलंदाज गावस्कर यांनी ओव्हल येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात थ्री लायन्सवर टीम इंडियाच्या नाट्यमय विजयानंतर रूटच्या नेतृत्वातील संघावर दबाव का येईल हे स्पष्ट केले आहे. स्पर्धात्मक 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभावी सुरुवात करूनही, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी कहर केला आणि इंग्लंडला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. ओव्हलमध्ये (The Oval) इंग्लंडच्या पराभवाबद्दल बोलताना गावस्कर म्हणाले की, टीम इंडिया मानसिक फायदा घेऊन 5 व्या कसोटी सामन्यात मैदानात उतरेल. (IND vs ENG: ओव्हलवर चौथ्या कसोटीत विराट कोहलीच्या ‘ट्रम्पेट सेलिब्रेशन’ वर Barmy Army ची प्रतिक्रिया)

“इंग्लंड संघ आणि इंग्रजी माध्यमांनी केलेली आणखी एक मोठी चूक म्हणजे ते फक्त अ‍ॅशेस मालिकेबद्दल बोलत होते. ते फक्त विचार करत आहेत की आम्हाला त्या मालिकेत कसे खेळायचे आहे. त्यांनी भारताच्या आव्हानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इंग्लंडने भारताला हलक्यात घेतले आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता तो ही मालिका जिंकू शकत नाही.” गावस्कर यांनी सामन्यात भारतीय टेलंडर्सच्या योगदानाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “जर भारताने दुसऱ्या डावात 280 धावा केल्या असत्या तर इंग्लंडवर इतका दबाव आला नसता. 368 धावांचा दबाव खूप जास्त होता. भारतीय टेलेंडर्सने संघासाठी अतिशय उपयुक्त योगदान दिले. आधी आपण हे लॉर्ड्सवर आणि आता या कसोटी सामन्यातही पाहिले. जेव्हा खालच्या क्रमवारीतील गोलंदाज धावा करतात, तेव्हा गोलंदाजी करताना त्यांचा आत्मविश्वास खूप जास्त होतो. मला खूप आनंद झाला आहे की भारताने 50 वर्षांनंतर ओव्हलवर एक कसोटी सामना जिंकला आहे.”

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 अशा आघाडीवर आहे. आता मँचेस्टर येथे मालिकेच्या पाचव्या सामन्याचा थरार रंगणार आहे. विराटसेनेने जर हा सामना जिंकला तर 2008 मध्ये राहुल द्रविडच्या टीम इंडियानंतर इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका जिंकणारा पहिला संघ ठरू शकतो. त्या दौऱ्यानंतर 2014 आणि 2018 ब्रिटन दौऱ्यावर संघ विजयी रेष पार करण्यात अपयशी ठरला होता. अशा स्थितीत भारतीय संघाकडे आता बहुप्रतिक्षित विजय मिळवण्याची संधी आहे.