IND vs ENG Test Series 2021: टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंड फलंदाज राहुल द्रविड कडून घेणार धडे, कसे ते पहा!
राहुल द्रविड (Photo Credit: Wikimedia Commons/Twitter)

IND vs ENG Test Series 2021: इंग्लंड संघ द्विपक्षीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर (England Tour of India) येणार आहे. मात्र, सध्या टीम श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत असून त्यांचे काही खेळाडू फिरकीविरूद्ध संघर्ष करताना दिसत आहेत. अशा स्थितीत संघाचा माजी फलंदाज केवीन पीटरसन (Kevin Pietersen) त्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. पीटरसनने फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध प्रभावी बॅटिंग करण्यासाठी त्याला राहुल द्रविडने (Rahul Dravid) पाठवलेला ई-मेल शेअर केला आहे. पीटरसन एकेकाळी सर्वात आक्रमक फलंदाज होता, पण त्याच्याही कारकिर्दीत असा एक काळ होता, जेव्हा त्यालाही फिरकी गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करावा लागत होता, विशेषत: बांग्लादेशच्या फिरकी गोलंदाजांसमोर. त्यामुळे पीटरसनने द्रविडकडे मदत मागितली ज्याने फिरकी गोलंदाजी साधारण कशाप्रकारे खेळायची याबद्दल सांगितले होते. पीटरसनने आता तो जुना ई-मेल शोधून काढला आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाला टॅग करत आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामुळे, द्रविडचं इंग्लंड फलंदाजांना मदत कारे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ()

श्रीलंकेच्या फिरकीपटू लसिथ एंम्बुलडेनियाविरुद्ध इंग्लंडचे दोन्ही सलामी फलंदाज डोम सिब्ली (Dom Sibley) आणि जॅक क्रॉली (Jack Crawley) संघर्ष करताना दिसले. श्रीलंकन फिरकीपटूने इंग्लंड सलामी फलंदाजांना फक्त पहिल्याच नव्हे तर दुसर्‍या कसोटी सामन्यातही माघारी धाडलं. आणि आता जेव्हा श्रीलंकन फिरकी गोलंदाजाविरुद्ध दोन्ही फलंदाजांची अशी स्थिती आहे, तर अश्विन आणि कुलदीपसारख्या महारथींविरुद्ध तर ती आणखी वाईट होऊ शकते. अशास्थितीत पीटरसनने सिब्ली आणि क्रॉली यांना मदत देऊ केली आहे. त्याने ट्विट करत द्रविडने त्याला लिहिलेला इमेल शेअर केला आहे. त्यापूर्वी पीटरसनने ट्विट केले की ‘अहो @englandcricket, हे प्रिंट करा आणि सिब्ली आणि क्रॉलीला द्या. इच्छूक असल्यास ते अधिक चर्चा करण्यासाठी मला कॉल करू शकतात ...!’ ई-मेलमध्ये द्रविडने फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल सांगितले. पुढच्या पायांवर वचन न देणे आणि आता व नंतर शॉट मारण्याची करण्याची चिंता न करण्याचे महत्त्व त्याने स्पष्ट केले.

इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी सध्या सुरू असलेल्या श्रीलंका दौऱ्यावर तीन डाव खेळले आहेत आणि धावांसाठी संघर्ष करावा लागला आहे. सिब्लीने तीन डावात फक्त 6 धावा केल्या आहेत तर क्रॉलीने 22 धावा केल्या आहेत. सलामीवीर सिब्ली आणि क्रोली यांची भारत विरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. शिवाय, बेन स्टोक्स, जोस बटलरया आणि जोफ्रा आर्चर यांचेही संघात कमबॅक झालं आहे.