IND vs ENG 1st Test Day 4: भारत (India) आणि इंग्लड (England) संघातील टेस्ट सिरीजचा दुसरा सामना चेन्नई (Chennai) येथे 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान खेळला जाणार असून तिसरा व चौथा कसोटी सामना 24 ते 28 फेब्रुवारी आणि 4 ते 8 मार्च दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळला जाणार आहे. यापूर्वी, चाहत्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम आणि अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात चाहत्यांच्या एंट्रीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. 13 फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंडमधील दुसर्या कसोटी सामन्यासाठी चेपॉक स्टेडियमचे (Chepauk Stadium) तीन स्टॅण्ड- I, J आणि K2012 नंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी उघडले जातील. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विविध कारणांमुळे या स्टेडियमचे तिन्ही स्टँड्स बंद करण्यात आले होते. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे (Tamil Nadu Cricket Assosiation) सचिव आर एस रामासामी दुसर्या कसोटी सामन्याच्या तिकिट विक्रीला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. (IND vs ENG Test 2021: अहमदाबादचं मैदान गाजवण्यासाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सज्ज, नेटमध्ये जोरदार कमबॅकचे दिले संकेत, पहा व्हिडिओ)
PTI मध्ये दिलेल्या माहितीनुसार सामन्यासाठी तब्बल 15,000 तिकिटांची विक्री केली जाईल. मालिकेच्या सलामीच्या कसोटी सामन्यात प्रवेशासाठी बंदी घातलेल्या माध्यमांनाही दुसऱ्या सत्रात प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मोटेरा स्टेडियमवर दिवस/रात्र खेळला जाईल. मालिकेचा चौथा सामनाही याच स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एएनआयशी बोलताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने मोटेरा कसोटी सामन्यात चाहत्यांना प्रवेश मिळेल याची पुष्टी केली. “हो, आमच्या शेकडो क्रिकेटप्रेमी चाहत्यांसाठी स्वागत चिन्हे म्हणून आता त्यांना मोटेरा टेस्टसाठी स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात येईल,” असे या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात, क्रीडा मंत्रालयाने आपल्या मानक कार्यप्रणालीमध्ये (एसओपी) बदल केला होता आणि COVID-19 प्रोटोकॉलनंतर स्टेडियम पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली होती.
कोविड-19 महामारीच्या उद्रेकानंतर भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड मालिकेचा सलामीला सामना रिक्त स्टेडियममध्ये खेळवला जात आहे.