IND vs ENG T20I 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चौथ्या टी -20 सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) विजयाने बरेच कारण समोर आले. एक प्रकारे हा सामना भारताच्या (India) एकूण संघाच्या कामगिरीचा पुरावाच ठरला. भारतीय संघाच्या या सामन्यात विजेत्यांमध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचेही नाव होते, ज्याने दडपणाखाली आपला प्रभाव सोडला. जेव्हा सामना रोमांचकारी टप्प्यावर पोहचला त्या क्षणात शार्दुल ठाकूरने केवळ धावाच रोखल्या नाहीत तर एका पाठोपाठ एक विकेटही घेतली. पण, शार्दूलच्या या कामगिरीमागे खरं तर तेव्हा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या उपकर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) मास्टरप्लान होता ज्याने इंग्लिश संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. सामन्यानंतर स्वतः शार्दूलने याबाबत खुलासा केला. सामन्यात 16व्या ओव्हरमध्ये संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेर पडला, ज्यानंतर रोहितने कमान सांभाळली. (सूर्यकुमार यादवच्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची दणक्यात सुरूवात, रोहित शर्माचे 10 वर्षांपूर्वीचे ‘ते’ एक ट्विट व्हायरल)
शार्दुलने विराटच्या नेतृत्वात आपल्या कोट्यात 2 षटके फेकली आणि उर्वरित 2 ओव्हर रोहितकजय नेतृत्वात फेकले. शार्दूल डावातील 17वी ओव्हर टाकण्यासाठी आला ज्यामध्ये त्याने बेन स्टोक्स आणि इयन मॉर्गनच्या महत्वपूर्ण विकेट घेतल्या. येथूनच सामन्याचा चेहरा बदलला आणि टीम इंडियानेही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. सामन्यानंतर शार्दुलने आपल्या गोलंदाजीची सर्व श्रेय रोहितला दिले आणि म्हणाला की, “रोहित मला म्हणाला की, तु तुझ्या शैलीनुसार गोलंदाजी कर. तसेच एका बाजूने सीमारेषा फार जवळ आहे. तो मुद्दा लक्षात ठेव. त्यानुसार गोलंदाजी कर असा सल्ला मला दिला. मी त्यानुसार गोलंदाजी केली.” या सामन्यात शार्दुलने 4 ओव्हर गोलंदाजी करत 42 धावा देत 3 विकेट घेतल्या.
यापूर्वी, सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली, ज्यामुळे यजमान संघाने निर्धारित ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 185 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, इंग्लिश टीम धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करू शकली नाही आणि 8 विकेट जमवून 177 धावाच करू शकली परिणामी संघाला 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. यासह आता विजयी संघाचा निर्णय 20 मार्च रोजी पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात होईल.