IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध लढतीपूर्वी विराट कोहलीच्या ‘या’ प्रमुख गोलंदाजाने केले निराश, Surrey काउंटी क्रिकेट डेब्यू ठरले अपयशी
रविचंद्रन अश्विन, विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध (England) पाच कसोटी सामन्यांच्या तयारीसाठी भारताचा (India) स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच काउंटी क्रिकेट क्लब Surrey नेही त्याला संधी दिली पण पहिल्या डावात तो फारसा परिणाम दाखवू शकला नाही. त्याने 43 ओव्हर गोलंदाजी केली आणि फक्त एक गडी बाद केला. चार दिवसांच्या या सामन्यात सोमवारी दुसर्‍या दिवसाच्या खेळादरम्यान सोमरसेटचा (Somerset) संघ 148.5 षटकांत 429 धावांवर बाद झाला. मात्र कसोटीत 400 हून अधिक विकेट्स घेतलेला अश्विन मात्र फारसे छाप पाडण्यात अपयशी ठरला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी टॉम लॅमनबॉयच्या रूपात त्याला एकमात्र विकेट मिळाली. (Virat Kohli ने ICC WTC ची ‘बेस्ट ऑफ थ्री’ फायनल खेळवण्याची मागणी, टीम इंडियाचा फिरकीपटू म्हणाला- ‘हे हास्यास्पद आहे!’)

4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने भारतीय संघाच्या यशात निर्णायक भूमिका बजावण्याची अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत अश्विन लयीत नसणे भारतीय संघाच्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या तयारीसाठी धक्का सिद्ध होऊ शकतो. भारतीय क्रिकेटपटू सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर तीन आठवड्यांच्या ब्रेकवर आहे. इंग्लंडविरुद्ध 14 जुलै रोजी डरहॅम येथे होणार्‍या मालिकेपूर्वी संघ एकत्र येणार आहे. दरम्यान, अश्विनने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा पल्ला गाठला. सरेकडून खेळत अश्विनने सोमरसेटविरुद्ध नवीन बॉलने गोलंदाजीला सुरुवात केली. यासह, अश्विन गेल्या 11 वर्षातील इंग्लिश काउंटीमध्ये नवीन चेंडूसह गोलंदाजीला सुरुवात करणारा पहिला स्पिनर बनला. त्याच्या अगोदर क्लॉड हेंडरसनने वर्ष 2010 मध्ये हा कारनामा केला होता. सरेपूर्वी अश्विन नॉटिंगहॅमशायर आणि वोस्टरशायरकडून खेळला आहे.

अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. त्याने 71 विकेट्स घेतले होते आणि मौल्यवान धावा देखील केल्या होत्या. गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने 45 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या पण बॅटने त्याला मधल्या फळीत फारशी कमाल दाखवता आली नाही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.