IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला जोर की झटका, Ishant Sharma याच्या बोटाला घातले टाके
इशांत शर्मा (Photo Credit: PTI)

Ishant Sharma Injury: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात पराभवाला मागे टाकून भारतीय संघाचे (Indian Team) पुढील लक्ष्य आता इंग्लंड (England) दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकण्याचे असेल. पण त्यापूर्वी टीम इंडियासाठी (Team India) चिंताजनक बाब म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या सरळ हाताच्या बोटाला टाके घालण्यात आले आहे. तथापि इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तो पूर्णपणे फिट होण्याची अपेक्षा केली जात आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात किवी संघाच्या दुसर्‍या डावादरम्यान स्वत:च्या बॉलवर ड्राइव्ह रोखताना तो जखमी झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला या ऐतिहासिक सामन्यात 8 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. (Team India: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया बनत आहे नवीन 'Chokers'? पाहा आकडेवारी)

अंतिम सामन्यात जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याला त्वरित मैदानातून बाहेर नेण्यात आले. ईशांतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या व चौथ्या बोटाला टाके घातले आहेत. “इशांतच्या उजव्या हातात मध्यभागी व चौथ्या बोटावर अनेक टाके घातले आहेत. परंतु ते फारसे गंभीर नाही,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले. “टाके जवळपास 10 दिवसात काढले जातील आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सहा आठवडे शिल्लक असून तो वेळेत बरा होण्याची अपेक्षा आहे.” भारतीय संघ गुरुवारी साऊथॅम्प्टनहून लंडनला पोहचला आहे आणि आता तीन आठवडे ते कुटुंबासोबत काही वेळ घालवतील.

“संघ एकत्र लंडनला रवाना झाला आहे. येथून ते सर्व 20 दिवसांच्या सुट्टीसाठी यूकेमध्ये आपापल्या ठिकाणी जाण्यास रवाना होऊ शकतात,” असे अधिकाऱ्याने सांगितले. विम्बल्डन आणि युरो 2020 स्पर्धा सुरु असल्याने काही खेळाडू या सामन्यांना हजेरी लावू शकतात. “त्यातील काही टेनिस चाहते आहेत आणि विम्बल्डन प्रेक्षकांना परवानगी देत असेल तर ते तुम्हाला कोर्टातील काही सामने पाहताना दिसतील. वेम्बली येथील युरो गेम्ससाठी तिकिटे उपलब्ध आहेत का, याची तपासणी काही जण करीत आहेत,” सूत्रांनी सांगितले. ते सर्व 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकत्र जमतील आणि त्यानंतर नॉटिंघॅमला जातील जिथे पहिली कसोटी खेळली जाणार आहे.