भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) 10 सप्टेंबरपासून मँचेस्टर (Manchester) येथे इंग्लंडविरुद्ध (England) अंतिम कसोटी खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. शमी आणि सहकारी वरिष्ठ वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना ओव्हल कसोटीतून (Oval Test) विश्रांती देण्यात आली होती ज्यात भारताने 157 धावांनी जबरदस्त विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 आघाडी घेतली आहे. आता मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर निर्णायक सामना रंगणार आहे. यामध्ये टीम इंडिया (Team India) विजयी झाल्यास 2008 नंतर पहिल्यांदा इंग्लंडमध्ये टेस्ट मालिका जिंकण्याचा मोठा कारनामा करतील तर इंग्लंड मालिका बरोबरी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतील. अशा स्थितीत असे समजले आहे की शमी अंतिम कसोटी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी बुधवारी संघाच्या प्रशिक्षण सत्रात सामील झाला होता. “शमी फिट आहे. आणि जेव्हा शमी तंदुरुस्त असतो, तेव्हा तो एक स्वयंचलित पर्याय असतो,” बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (India's 5th Test Likely Playing XI: निर्णायक टेस्टसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन महत्वपूर्व बदल, असा असू शकतो संभाव्य संघ)
शमीची फिटनेस स्थिती निश्चितपणे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक विक्रम राठौर यांना पाचव्या सामन्याआधी उपलब्ध पर्यायांवर विचार करण्यास मदत करेल. आतापर्यंत भारतीय गोलंदाजांमध्ये बुमराहने चार कसोटी सामन्यात सर्वाधिक 151 ओव्हर गोलंदाजी केली आहे. बुमराहच्या खात्यात 18 विकेट्स आहेत पण टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी व त्याआधी एक इंडियन प्रीमियर लीग जिथे त्याला मुंबई इंडियन्ससाठी तो मैदानात उतरेल. 14 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा मालिका जिंकण्याकडे डोळे लावून बसलेल्या भारत एक आदर्श प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवेल असे दिसत आहे, पण त्याचबरोबर वेगवान गोलंदाजांच्या कामाच्या ओझे व्यवस्थापनाची जाणीव असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, वैद्यकीय संघ अद्यापही रोहित (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन्ही खेळाडूंचे मूल्यांकन करत आहे परंतु ते आंशिक किंवा पूर्णपणे बरे झाले आहेत की नाही हे निश्चित होऊ शकले नाही.
रोहित बरा होत आहे असे समजले जात आहे आणि तो उपलब्ध होण्याची शक्यताही मोठी आहे परंतु वैद्यकीय टीम नंतर निर्णय घेईल. जर रोहित वेळेत तंदुरुस्त झाला नाही, तर अभिमन्यू ईश्वरन, मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ खेळण्यासाठी उपलब्ध असतील. तर पुजाराच्या अनुपस्थितीत हनुमा विहारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात शर्यत होईल.