
IND vs ENG 5th T20I 2021: माइकल वॉन (Michael Vaughan) यांचे असे मत आहे की जर ईशान किशन (Ishan Kishan) तंदुरुस्त असेल तर केएल राहुलला (KL Rahul) इंग्लंडविरुद्ध (England) मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात बाहेर बसावे लागेल. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मागील चार सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात राहुल संघर्ष करताना दिसला. भारताकडून अखेरच्या पाच टी-20 डावात राहुलने अनुक्रमे 0, 1, 0, 0, आणि 14 अशा धावा केल्या असून पुढच्या सामन्यात त्याच्या प्रभावी कामगिरी करण्यास दबाव आणला आहे. त्याने चार डावात फक्त 15 धावा केल्या आहेत तर किशनने मालिकेच्या दुसर्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 56 धावांची खेळी केली. इंग्लंडचे माजी कर्णधार वॉन यांनी म्हटले की भारत (India) आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वपूर्ण निर्णायक सामन्यासाठी तो राहुलला संघात खेळवणार नाही आणि सलामीच्या जागेसाठी किशनला प्राधान्य देईल. (IND vs ENG 5th T20I 2021: निर्णायक सामन्यात भारत-इंग्लंड जोरदार चुरशीची लढाई, ‘या’ 11 खेळाडूंसह मैदानात उतरेल टीम इंडिया, पहा संभावित Playing XI)
“केएल राहुल खेळत नाही, सोप्प आहे. आपण याकडे एक-सामना खेळण्याशिवाय पाहू शकत नाही आणि या क्षणी सर्वोत्तम खेळाडू कोण आहे, कोण सर्वात स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने खेळत आहे. इशान किशन फलंदाजीची सुरुवात करेल,” वॅनने सांगितले. इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे मत आहे की राहुल संघात कायम राहील परंतु किशन रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल. यामागचे कारण म्हणजे डावखुरा फलंदाजाचा सध्याचा फॉर्म आहे. विशेष म्हणजे, ईशान पाठोपाठ सूर्यकुमार यादवच्या 31 चेंडूत 57 धावांनी राहुलच्या संघातील स्थानावर धोका निर्माण केला आहे. यादवचा मॅच-विनिंग अर्धशतकाने प्लेइंग इलेव्हनमधील त्याच्या स्थानावर शिक्कामोर्तब केले आहे तर श्रेयस अय्यरने पहिल्या टी-20 मध्ये 67 आणि गुरुवारी 18 चेंडूत 37 धावांच्या शानदार खेळीने संघातील स्थान पक्क केलं आहे.
“माझ्यासाठी केएल राहुलला कायमच संघातून काढून टाकले जाणार नाही, परंतु या टप्प्यावर तो आत्मविश्वासाने खेळत नाही, तो फॉर्मशी संघर्ष करत आहे, म्हणून रोहितबरोबर फलंदाजी सुरू करण्यासाठी इशान किशन येईल. मुंबई इंडियन्सचे अधिक खेळाडू,” वॉन यांनी पुढे सांगितले. पाचवा टी -20 आंतरराष्ट्रीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.