IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारताने रोहित शर्मा-विराट कोहली (Rohit Sharma) यांची अर्धशतकी खेळी आणि सूर्यकुमार यादव-हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर 224 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा इंग्लंड (England) संघ 188 धावांपर्यंतच मजल मारू शकला परिणामी संघाला 36 धावांनी सामन्यासह मालिकेत पराभव पत्करावा लागला आणि यजमान भारताने 3-2 अशी मालिका खिशात घातली. दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंनी विशेषतः भारतीय कर्णधार विराट कोहली, मर्यादित ओव्हर संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडच्या डेविड मलाने (Dawid Malan) सामन्यात अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली जी खालीलप्रमाणे आहे. (IND vs ENG 5th T20I 2021: टीम इंडियाची निर्णायक सामन्यात बाजी, रोमांचक सामन्यात इंग्लडला 36 धावांनी लोळवत 3-2 ने काबीज केली मालिका)
1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टी -20 क्रिकेटमध्ये विक्रमांचा भडिमार केला. टी -20 आंतरराष्ट्रीयमध्ये विराटचे हे 28 वे अर्धशतक होते.
2. विराट टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक अर्धशतक करणारा कर्णधारही ठरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून हे त्याचे 12वे अर्धशतक होते. विराटने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला मागे टाकले जाणे या फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून आजवर एकूण 11 वेळा अर्धशतक ठोकले आहे.
3. टीम इंडियाची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंग्लंडविरुद्ध ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी त्यांनी डरबन येथे सप्टेंबर 2007 मध्ये 20 ओव्हरमध्ये218/4 अशी धावसंख्या उभारली होती.
4. विराट कोहली टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियन आरोन फिंचला मागे टाकले ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1462 धावा केल्या आहेत. कोहलीच्या आता 45 सामन्यात 1502 धावा झाल्या आहेत.
5. कोहलीचा भारतीय कर्णधार म्हणून 45वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता तर आरोन फिंचने आजवर 44 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे.
6. इतकंच नाही तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर आता सर्वाधिक 26 वेळ 50 किंवा अधिक धावांची नोंद झाली आहे.
7. इंग्लंडविरुद्ध 5व्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. रोहितने किवी फलंदाज मार्टिन गुप्टिलच्या 2839 धावांना मागे टाकत हा कारनामा केला आहे.
8. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट 1000 धावांचा टप्पा गाठणारा डेविड मालन वेगवान फलंदाज ठरला. यासह त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या अनुक्रम 27 आणि 26 डावात 1000 धावांचा टप्पा गाठण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मलानने 24 डावात हा कारनामा केला आहे.
9. इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे.
10. या सामन्यातील 200 पार धावसंख्येवर भारतीय संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 18व्या वेळी द्विशतकी धावांचा पल्ला गाठला. 2006 पासून भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने संघाने 14 वेळा अशी कामगिरी नोंदवली आहे.
11. विराट कोहलीने आजच्या सामन्यातील आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आशिया खंडात वेगवान 13000 धावांचा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 260 डावात हा टप्पा गाठला तर सचिन तेंडुलकरने 277 डावात हे शिखर सर केलं होतं. शिवाय, अशी कामगिरी करणारा तो एकूण सहावा फलंदाज आहे.
दरम्यान, टी-20 मालिकेनंतर आता दोन्ही संघ पुणेच्या गहुंजे स्टेडियमवर तीन सामान्यांच्या वनडे मालिकेत आमने-सामने येतील. राज्यात वेगाने होणाऱ्या कोविड-19 प्रसारामुळे या मालिकेसाठी प्रेक्षकांच्या उपास्थीवर रोख लावण्यात आली आहे.