IND vs ENG 4th Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश सलामीवीर हसीब हमीदच्या (Haseeb Hameed) एका कृतीमुळे भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खूपच संतापला. पहिल्या डावात टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ (Indian Team) 191 धावांवर ढेर झाला. त्यानंतर रॉरी बर्न्स आणि हमीद इंग्लंडसाठी फलंदाजीसाठी उतरले. फलंदाजी करताना हमीदने गार्ड घेऊन खेळपट्टीवर 'छेडछाड' केली. हमीदने क्रीजच्या बाहेर गार्डला चिन्हांकित केले, खेळपट्टीला त्याच्या शूजने चोळले ज्यामुळे कोहलीला अंपायरशी बोलण्यास भाग पाडले. कोहलीने याबाबत मैदानावरील पंचांकडे तक्रार केली. त्याने मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थला सांगितले की तो फलंदाजाच्या कृतीवर नाखूष आहे. (IND vs ENG 4th Test: विराट कोहलीवरून इंग्लंडची बार्मी आर्मी आणि द भारत आर्मी आली आमने-सामने, रंगले ट्विटर वॉर)
ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवसही हे सर्व घडले जेव्हा हमीदने क्रीजच्या बाहेर त्याच्या गार्डला चिन्हांकित केले आणि त्याला शू स्पाइकने मारले. क्रीजच्या बाहेर शू स्पाइक किंवा बॅट किंवा बेल्सने चिन्हांकित करणे सामान्य असले तरी कोहलीने आक्षेप घेतला की हमीदने क्रीजच्या आत ते केले नाही. इंग्लंडच्या सलामीवीराच्या या कृतीची कमेंट्री बॉक्समध्येही चर्चा रंगली. हर्षा भोगले आणि अजय जडेजा यांनीही या विषयावर चर्चा केली व मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हा कोणताही फलंदाज क्रीजवर येतो तेव्हा आधी तो आपला गार्ड घेतो. गार्ड घेणे म्हणजे ज्या ठिकाणी त्याला उभे राहायचे आहे आणि चेंडू खेळायचा आहे ते चिन्हांकित करणे. यासाठी फलंदाज त्या ठिकाणी पायाने किंवा कधीकधी बॅटने खुणा करतात. मात्र, फलंदाजाला खेळपट्टीवर सर्वत्र गार्ड घेण्यास मनाई आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही फलंदाज क्रीजपासून 5 फूट दूर गेल्यानंतर निशाण उमटवू शकत नाही. क्रीजच्या 5 फूट अंतरानंतर डेंजर एरिया येतो जिथे फलंदाजांनाही धावण्यास मनाई असते.
What is your take on batsmen marking their guard perilously close to the forbidden area of the pitch?
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! 📺#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Hameed #Pant pic.twitter.com/pFuW2n3vEi
— Sony Sports (@SonySportsIndia) September 2, 2021
दरम्यान, तब्बल पाच वर्षानंतर इंग्लिश कसोटी संघात कमबॅक करणारा हसीब हमीद ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात फार काही प्रभाव पाडू शकला नाही आणि खाते न उघडता 12 चेंडूंचा सामना करत जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. पहिल्या दिवशी इंग्लंडने तीन बाद 53 धावा केल्या होत्या. तर रोरी बर्न्स, हसीब हमीद आणि कर्णधार जो रूट पॅव्हिलियनमध्ये परतले होते.