IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटी Virat Kohli याचा धमाका, 2019 नंतर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये केला ‘हा’ कारनामा
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 1: भारतीय क्रिकेट चाहते टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) पुढील आंतरराष्ट्रीय शतकाच्या बऱ्याच काळापासून प्रतीक्षेत आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यत चाहत्यांची आशा वाढवली होती पण 50 धावा करून बाद होऊन माघारी परतला. पण हे अर्धशतक विराट आणि त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास ठरले आहेत. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत 50 धावांची मजल मारली आणि आगळावेगळा कारनामा केला. दोन वर्षांत भारतीय कर्णधाराने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये दोन पाठोपाठ अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. तत्पूर्वी, कोहलीने लीड्स येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 55 धावा केल्या होत्या. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये सलग दोन अर्धशतके केली होती. विराटने ऑगस्ट 2019 मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्ध अनुक्रमे 51 (नॉर्थ साउंडवर) आणि 76 (किंग्स्टन येथे) धावा ठोकल्या होत्या. (IND vs ENG 4th Test Day 1: ओव्हल कसोटीत Ravindra Jadeja याला मिळाली 5 व्या स्थानावर बढती, पण योजना ठरली अयशस्वी; काय होती टीम इंडियाची रणनीती?)

दरम्यान, कोहली मोठी धावसंख्या बनवण्यासाठी चांगल्या लयीत दिसत होता पण ओली रॉबिन्सनने त्याला पुन्हा एका चेंडूवर बाद केले. यासह आता इंग्लंड दौऱ्यावर रॉबिन्सनने मालिकेत कोहलीला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. इंग्लंडने चहापानाच्या वेळेपर्यंत भारताला 122/5 धावांवर रोखत आपला पहिला गोलंदाजी करण्याचा पर्याय योग्य ठरवला. दिवसाच्या सुरुवातीला हेडिंग्ले येथे डावाच्या पहिल्याच दिवशी 78 धावांवर बाद झालेल्या भारताने अधिक सकारात्मक सुरुवात केली. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्माने लयीशी संघर्ष करणाऱ्या जेम्स अँडरसनचा चांगलाच समाचार घेतला. सॅम कुरनच्या जागी एक वर्षानंतर कसोटी संघात कमबॅक करणाऱ्या क्रिस वोक्सचे पहिल्याच ओव्हरमध्ये रोहितला 11 धावांवर स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर राहुल 17 धावांवर बाद झाला. रॉबिन्सनने राहुलला पायचीत करून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. चेतेश्वर पुजारा देखील संघाचा डाव सावरण्यात अपयशी ठरला. विराट वगळता आघाडीचे पाचही फलंदाज २० धावसंख्या पार करू शकले नाही.

दरम्यान, आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघानी प्रत्येकी दोन बदल केले आहेत. भारतीय संघात मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना विश्रांती दिली असून त्यांच्या जागी शार्दूल ठाकूर व उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे. तसेच इंग्लंडने सॅम कुरनच्या जागी वोक्स आणि जोस बटलरच्या जागी ओली पोप खेळत आहे.