IND vs ENG 4th Test Day 1 Live Streaming: भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या TV Telecast बाबत सर्वकाही
IND Vs END (Photo Credit: England Cricket)

IND vs ENG 4th Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा आणि अखेरचा सामना आज (4 मार्च) अहमदबादच्या नरेंद्र मोदी मैदानात खेळला जाणार आहे. या 4 कसोटी सामनाच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. यामुळे ही मालिका खिश्यात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तर, या मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात उतरणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार आज सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात. तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असणार आहे.

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी बजावून दाखवली आहे. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सामना जिंकणे गरजेचे होते. मात्र, भारताने हा सामना जिंकून मालिकेवर आघाडी घेतली आहे. हे देखील वाचा- ICC T20I Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारी जाहीर; केएल राहुल दुसऱ्या स्थानी कायम तर, विराट कोहली याची एका स्थानाची झेप

संघ-

भारत:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड:

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.