मयंक अग्रवाल आणि मोहम्मद सिराज (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 4th Test 2021: गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडने (England) आघाडीचे तीन फलंदाज गमावल्यामुळे चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच यजमान भारतीय संघाचे (Indian Team) वर्चस्व पाहायला मिळाले. अक्षर पटेलने दोन विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) इंग्लिश कर्णधार जो रूटची सर्वात महत्त्वपूर्ण विकेट घेतली. सिराजने दुसऱ्या सत्रातील पहिले षटक टाकताना रुटला अतिशय वेगवान चेंडू टाकला आणि तो चेंडू रूटला कळायच्या आधीच त्याच्या पॅडला जाऊन धडकला. सिराजने जोरदार अपील केल्यावर अंपायरने रूटला बाद दिले. अशाप्रकारे सिराजने चांगल्या लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. विकेट मिळताच मयंक अग्रवालसह (Mayank Agarwal) सिराज आपला 'खास सेलिब्रेशन' करताना दिसला, तथापि अग्रवाल प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही आणि नेटिझन्सना लवकरच काहीतरी लक्षात आले. (IND vs ENG 4th Test Day 1: मोहम्मद सिराजने डिचवलं, विराट कोहली-बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर झाला जोरदार वाद, अंपायरना करावा लागला हस्तक्षेप)

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही सिराज विकेट घेताना अग्रवाल नेहमीच सेलिब्रेशनमध्ये हजर का असतो? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला. चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने गुरुवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करत यजमान संघाने त्यांच्या लाइनअपमध्ये एक बदल केला. दुसरीकडे, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चरच्या जागी डोमिनिक बेस आणि डॅन लॉरेन्स यांना आणत इंग्लंडने त्यांच्या लाइनअपमध्ये दोन बदल केले. पहा मयंक आणि सिराजच्या सेलिब्रेशनवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

योगायोग!

सिराज-मयंक सेलिब्रेशन!

सिराजने विकेट घेतल्यावर मयंक

याक्षणासाठी अक्षरच्या जगी मयंक!

मयंक आणि सिराज

दरम्यान, भारताविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंड कर्णधार जो रूटच्या कामगिरीकडे पहिले तर पहिल्याच सामन्यात 218 धावा करणारा इंग्लंड संघाचा कर्णधार पुढील 3 सामन्यात अपयशी ठरला असून त्याला सामन्याच्या एकाही डावात अर्धशतक झळकावता आले नाही. त्याने या मालिकेत एकूण 338 धावा केल्या आहेत. शिवाय, चौथ्या सामन्यातही तो 5 धावाच करू शकला.