भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th T20I 2021 Live Streaming: अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवर इंग्लंड (England) संघाविरुद्ध टीम इंडिया (Team India) 'करो या मरो'च्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही उभय संघातील पाच सामन्यांच्या मालिकेचा आज चौथा टी-20 सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात यजमान संघाला विजय मिळवणे गरजेचे आहे कारण सामन्यात पराभव झाल्यास संघ मालिका देखील गमावलं. नाणेफेकीच्या अवलंबून राहण्यासाठी सुधारित अष्टपैलू कामगिरी करीत भारतीय संघाला (Indian Team) इंग्लंडविरुद्ध मालिकेतील आव्हान टिकवावे लागणार आहेत. भारत आणि इंग्लंड संघातील चौथ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल तर 6:30 वाजता टॉस होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. शिवाय, Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि तामिळ) सामना लाईव्ह प्रसारित करणार आहे. (IND vs ENG 4th T20I 2021: ‘करो या मरो’च्या चौथ्या टी-20 साठी Team India मध्ये होणार मोठे बदल? पहा इंग्लंडविरुद्ध भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

दरम्यान, फिरकीपटू युजवेंद्र चहल दोन्ही पराभूत सामन्यांत महागडा ठरला. शिवाय, हार्दिक पंड्या चेंडूने अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही तर दुखापतीतून सावरून पुनरागमन केलेला भुवनेश्वर कुमार देखील अपयशी ठरला. भारतीय संघाला सर्वात  मोठा फटका सलामी जोडीच्या रूपात बसला. टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत मागील दोन्ही सामन्यात संघाची सलामी जोडी पॉवर प्लेमध्ये झगडताना दिसले. केएल राहुल तिन्ही सामन्यांत अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीने राहुलवर अपयशानंतर देखील विश्वास दर्शवला आहे त्यामुळे यंदाच्या सामन्यात त्याच्यावर कामगिरी करण्यासाठी दबाव असेल.

असा आहे भारत-इंग्लड टी-20 संघ

भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन (राखीव विकेटकीपर).

इंग्लंड टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जेसन रॉय, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरन, टॉम कुरन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.