IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स कसोटीत भारतीय संघाचा (Indian Team) ऐतिहासिक विजय असूनही कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) एक धोकादायक बातमी समोर आली आहे. लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात विराट पहिल्या डावात 42 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 20 धावा करून बाद झाला. कोहलीने आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) मोठ्या संख्येने गुण गमावले आहेत, तर रोहित शर्माने (Rohit Sharma) कारकीर्दीतील सर्वोत्तम कसोटी रँकिंग गाठली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट पाचव्या क्रमांकावर आहे, परंतु तो 776 च्या गुणांवर घसरला आहे. दुसरीकडे, रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 773 चे सर्वोत्तम रेटिंग मिळवली आहे आणि यासह, आता त्याच्या आणि विराटमध्ये फक्त 3 गुणांचे अंतर राहिले आहे. (IND vs ENG: विराट कोहलीच्या Team India शी संघांनी का घेऊ नये पंगा? इंग्लंडने ऑस्ट्रेलियाकडून घ्यायला पाहिजे धडा)
रोहित कसोटी क्रमवारीत दुसरा सर्वोत्तम भारतीय फलंदाज आहे. भारत इंग्लंडविरुद्ध 25 ऑगस्टपासून लीड्स (Leeds) येथे तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. आणि जर रोहितने या सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आणि कोहली फ्लॉप झाला तर आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर होऊ शकतो. पहिल्यांदाच रोहित कसोटी क्रमवारीत कोहलीसारख्या जगातील सर्वोत्तम फलंदाजाला मागे टाकू शकतो. रोहित शर्माने कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी 773 गुण मिळवले आहेत. तसेच रोहितने असे केले तर कसोटी क्रिकेटमधील त्याच्या तंत्रावरील डाग कायमचा धुवून निघेल, कारण बहुतेक क्रिकेट दिग्गजांचे मानणे आहे की रोहित कसोटी नाही तर केवळ वनडे, टी-20 चा फलंदाज आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचा वनडे आणि टी-20 उपकर्णधार रोहित कसोटी संघाचा देखील कर्णधार बनण्याचा दावेदार बनू शकतो. अनेकदा एकदिवसीय क्रिकेटसाठी विराट विरुद्ध रोहित यांच्यात तुलना केली जाते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद 180 धावांच्या खेळीने इंग्लिश कर्णधार जो रूटला आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज केन विल्यमसनच्या जवळ नेले आहे. रूटची रेटिंग 893 आहे, जी किवी कर्णधार विल्यमसनच्या तुलनेत फक्त आठ कमी आहे. विल्यमसनचे 901 गुण आहेत. 29 वर्षीय राहुलने 2017 मध्ये कारकीर्दीतील सर्वोत्तम आठवे स्थान मिळवले होते. आणि आता लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात 127 धावा केल्यावर तो आता 37 व्या स्थानावर पोहचला आहे.