
IND vs ENG 3rd D/N Test: अहमदबादच्या (Ahmedabad) तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला (Team India) विजयासाठी मिळालेल्या अवघ्या 49 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने रात्रीच्या जेवणापर्यंत बिनबाद 11 धावा केल्या आहेत. दिवसाच्या दुसऱ्या सत्राची घोषणा झाली तेव्हा मैदानात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) ही सलामी जोडी खेळत असून संघाला विजयासाठी आणखी 38 धावांची आवश्यकता आहे. अहमदबादच्या मोटेरा येथे पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) भारत आणि इंग्लंड (England) संघात पिंक-बॉल टेस्ट (Pink Ball Test) सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला यजमान संघाला 145 धावांवर ऑलआऊट करत इंग्लंडचा दुसरा डाव 30.4 षटकांत 81 धावांवर संपुष्टात आला. तसेच भारताने पहिल्या डावात 33 धावांची आघाडी घेतल्याने संघाला आता सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे आव्हान मिळाले. (IND vs ENG 3rd D/N Test: अक्षर-अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडची घसरगुंडी, टीम इंडियाला पिंकबॉल टेस्टमध्ये विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य)
लोकल बॉय अक्षर पटेलने आपल्या फिरकीवर पाहुण्या इंग्लंडला नाचवलं आणि एकूण 11 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. अक्षरने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 धावा केल्या. शिवाय, कर्णधार रुट आणि ऑली पोप यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. रुटने 19 आणि पोपने 12 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने 4 विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. भारताला 145 धावांवर बाद केल्यानंतर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला मात्र, त्यांची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पटेलने झॅक क्रॉलीला शुन्यावर त्रिफळाचीत केले. यासह डावातील आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा जगातील चौथा तर अश्विननंतर दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
दुसरीकडे, टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी 3 बाद 99 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण पहिल्या सत्रात 145 धावांपर्यंतच मजल मारू शकली. अशास्थितीत, यजमान संघाने दुसऱ्या दिवशी 46 धावांवर 7 विकेट गमावल्या. रोहित शर्माने सर्वाधिक 66 धावा केल्या तर इंग्लिश कर्णधार रूटने 5 विकेट घेतल्या. जॅक लीचला 4 आणि जोफ्रा आर्चरला 1 विकेट मिळाली.