IND vs ENG 2nd Test: विराट कोहलीने गेल्या ‘इतक्या’ आंतरराष्ट्रीय डावांमध्ये झळकावले नाही एकही शतक, लॉर्ड्स टेस्टमधेही झाला फ्लॉप
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 4: भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी ओळखला जातो तशी गेल्या काही काळापासून तो फलंदाजी करू शकला नाही. रन मशीनच्या नावाने जगभरात प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीला धावा काढण्यावर अंकुश आले आहे आणि ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) दोन्ही डावांमध्ये विराट कोहलीने निराश केले. विशेषत: दुसऱ्या डावात जेव्हा संघाला मोठ्या धावसंख्येची गरज होती जेव्हा तो 20 धावांवर बाद झाला. तसेच त्याने पहिल्या डावात 42 धावांचे योगदान दिले होते. विराटने अखेर बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये कसोटी शतक झळकावले होते. विशेष म्हणजे डिसेंबर 2019 पासून 49 डावात विराट एकही आंतरराष्टीय शतक करण्यात अपयशी ठरला आहे. (IND vs ENG 2nd Test Day 4: भर मैदानात James Anderson याच्याशी भिडला Virat Kohli, इंग्लिश गोलंदाजावर टाकले शाब्दिक ‘बाउन्सर’)

इंग्लंडच्या मातीवर विराट कोहलीने 2018 दौऱ्यावर कसोटी मालिकेत धमाका केला आणि जोरदार धावा लुटल्या. यंदाही तो असेच काही करेल अशी अपेक्षा आहे, पण आतापर्यंत त्याने निराशा केली आहे. इंग्लंडमधील शेवटच्या तीन डावांमध्ये त्याने 0, 42, 20 अशा धावा केल्या आहेत. याशिवाय आणखी तीन कसोटी सामने शिल्लक आहेत आणि पुढे काय होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही, पण सध्या विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बराच काळ शतक झळकावू शकला नाही आणि प्रत्येकजण त्याच्या 71 व्या आंतरराष्ट्रीय शतकाची आतुरतेने वाट पाहत आहे. इतकंच नाही तर त्याला गेल्या 7 डावांमध्ये पन्नाशी गाठता आलेली नाही. कोहलीने इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये दोन अर्धशतके केली होती. याशिवाय त्याने अॅडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

एकापाठोपाठ एक शतके करणारा विराट कोहली सध्या फॉर्मशी झुंज देत आहे. 2019 ते 2021 पर्यंत आत्तापर्यंत विराटच्या बॅटमधून शतक झळकले नाही, ज्याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, यापूर्वी 2014 मध्ये विराट कोहलीने सलग 25 आणि 2011 मध्ये त्याने सलग 24 डावांमध्ये शतक झळकावले नव्हते. आता त्याने शतक झळकावण्याच्या बाबतीत त्याचा मागील विक्रमही मोडला आहे. कोहली 2016, 2017 आणि 2021 नंतर सलग 7 डावांमध्ये फ्लॉप ठरला आहे. नोव्हेंबर 2019 पासून कोहलीने 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 649 धावा केल्या आहेत.