विराट कोहली, जेम्स अँडरसन (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test Day 4: लॉर्ड्सवर (Lords) इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सामना सुरु असताना दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनशी (James Anderson) जाऊन भिडला. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील 17 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जेव्हा अँडरसन बॉलिंगच्या टोकाला जात होता तेव्हा तो काहीतरी बोलतो ज्यावर विराट कोहली त्याच्यावर पलटवार केला. विराट आणि अँडरसन यांच्यातील शाब्दिक लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होता आहे. कोहली जेम्स अँडरसन विरोधात अपशब्द वापरताना ऐकू येऊ शकतो आणि नंतर म्हणतो, “ही खेळपट्टी आहे आणि तुम्ही इथे धावत आहात, हे तुझे घर नाही.” (IND vs ENG 2nd Test Day 4: आधी खाल्ला षटकार त्यानंतर इंग्लिश गोलंदाजाने रोहित शर्माशी ‘असा’ केला हिशोब चुकता!)

लॉर्ड्स कसोटीत भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि केवळ 20 धावा करून सॅम कुरनच्या चेंडूचा बळी ठरला. कोहली दोन्ही डावांमध्ये मोठी धावा करण्यात अपयशी ठरला. लॉर्ड्सवर कोहली आपली विराट शैली दाखवेल अशी अपेक्षा होती पण ते होऊ शकले नाही. कोहलीने पहिल्या डावात 42 धावा केल्या. कोहली बॅटने चांगला खेळू शकला नाही पण जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत तो चाहत्यांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला. त्याने अँडरसनवर शाब्दिक ‘बाउन्सर’ देखील टाकले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कोहली अँडरसनला खेळपट्टीवर फटकारताना दिसत आहे. तसेच लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसन फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या आणि भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात एक बाउन्सरची लढाई पाहायला मिळाली. बुमराहने अँडरसनवर एकामागून एक बाऊन्सर टाकले होते आणि एक चेंडू अँडरसनच्या हेल्मेटलाही लागला होता.

दरम्यान, भारतीय संघ दुसऱ्या डावात अडखळला आहे. दुपारच्या जेवणापर्यंत भारताच्या 56/3 धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. रोहितने 21, तर राहुलने 5 धावा केल्या. या व्यतिरिक्त कोहलीला केवळ 20 धावांच करता आल्या. दुसरीकडे, इंग्लंडसाठी मार्क वुडने आक्रमक गोलंदाजी केली आणि 2 विकेट्स काढल्या. तसेच सॅम कुरन विकेट घेण्यात यशस्वी ठरला.