IND vs ENG 2nd Test Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील दुसरी टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या LIVE Streaming व TV Telecast बाबत सर्वकाही
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट (Photo Credit: PTI, Twitter)

IND vs ENG 2nd Test Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला आजपासून चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु होणार आहे. सलामीच्या कसोटीत यजमान संघाला इंग्लंडने 227 धावांनी पराभवाचा स्वाद चारला होता. कर्णधार जो रुटने (Joe Root) त्याच्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आणि इंग्लंडने चेपॉक स्टेडियमवर धावांचा डोंगर उभारला. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने भारताच्या पहिल्या डावातील फलंदाजीने प्रभावित झाले, पण दुसऱ्या डावात दबाव आणण्यात अपयशी ठरले. आता दुसरा सामानही त्याच मैदानावर होणार असल्याने दोन्ही संघ सावध असतील आणि आपला सर्वोत्तम खेळ करू इच्छित असतील. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल तर टॉस 9:00 वाजता होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 2nd Test 2021: ‘या’ 3 भारतीय खेळाडूंना कसोटी शतकांचा दुष्काळ संपवण्याची संधी, Chepauk वर इंग्लंडविरुद्ध पडू शकतो धावांचा पाऊस)

दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी भारतीय संघात काही बदल होणे निश्चित दिसत आहे. दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यातून बाहेर पडलेला अक्षर पटेल निवडीसाठी उपलब्ध असून कसोटी पदार्पणासाठी सज्ज असेल, तर इंग्लंडने शुक्रवारी अखेरच्या 12 खेळाडूंची घोषणा केली आहे ज्यात चार बदल करण्यात आले आहेत. जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन, जोस बटलर आणि डॉम बेस यांना बाहेर केले असून स्टुअर्ट ब्रॉड, बेन फोक्स, क्रिस वोक्स आणि ऑली स्टोन यांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे, टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवला संधी देते की नाही यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

असा आहे भारत आणि इंग्लंड कसोटी संघ

भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव,  जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंडचे अंतिम 12: रोरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, क्रिस वोक्स आणि ओली स्टोन.