हनुमा विहारी आणि रिषभ पंत (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील 13 फेब्रुवारीपासून भारतीय संघ चेपॉकच्या (Chepauk) मैदानावर उतरतील. पाहुण्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात 227 धावांनी पराभवाला सामोरे गेलेल्या टीम इंडियाला (Team India) मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचीही अंतिम संधी आहे. शिवाय, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यजमान भारतीय संघाला (Indian Team) आगामी सर्व विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजीने अपयशी ठरलेल्या टीम इंडियाकडून यंदा बॅटिंग विभागात सुधार करत पराभवाई खेळीची अपेक्षा आहे. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) झालेल्या पहिल्या सामन्यात धावांसाठी झगडलेले फलंदाज दुसऱ्या सामन्यात चांगली खेळी करण्याची अपेक्षा आहे. अशास्थितीत, टीम इंडियामध्ये असे काही फलंदाज आहेत जे दुसऱ्या सामन्यात आपल्या शतकांचा दुष्काळ संपवतील. (IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माच्या फॉर्मने वाढवलं टीम इंडियाचं टेंशन, दुसऱ्या टेस्ट सामन्यात मोठी खेळी करण्यावर असेल दबाव)

1. विराट कोहली

'रनमशीन' विराटने अखेर बांग्लादेशविरुद्ध 2019 मध्ये शतकी धावसंख्या पार केली होती. तेव्हापासून विराट आंतरराष्ट्रीय स्टेजवर शंभरी धावसंख्या गाठण्यासाठी संघर्ष करत आहे. अनेकदा विराट शतकी धावसंख्येच्या जवळ पोहचला मात्र, टप्पा पार करू शकला नाही. इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात विराटने 72 धावांची शानदार केली. दुसरा सामना ही चेन्नईच्याच मैदानावर होणार असल्याने कोहली यंदा तरी चाहत्यांची अपेक्षापूर्ती करू शकतो.

2. चेतेश्वर पुजारा

भारताचा टेस्ट स्पेशलिस्ट पुजाराने 2019 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक करत 193 धावांची विजयी खेळी केली होती. त्यानंतर, सौराष्ट्रच्या या अनुभवी फलंदाजाने 9 वेळा अर्धशतकी धावसंख्या गाठली मात्र, तो तिहेरी धावसंख्येचा आकडा पार करू शकला नाही. शिवाय, चेन्नईतील खेळपट्टी त्याच्या साठी अनुकूल असल्याने त्याला शतक करण्याची मोठी संधी आहे.

3. रिषभ पंत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि ब्रिस्बेन व नुकतंच इंग्लंडविरुद्ध चेन्नई येथील पहिल्या सामन्यात शानदार फलंडनजीने पंतकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पंतने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 91 धावा केल्या, मात्र दुसऱ्यांदा फेल झाला. पुजाराप्रमाणेच पंतने देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2019 मध्ये सिडनी टेस्टमध्ये अखेर नाबाद 159 धावांचा डाव खेळला होता. त्यामुळे, पंतचा फॉर्म असाच राहिला तर, तो दुसऱ्या कसोटीत आपल्या कारकीर्दीतील तिसरे आंतरराष्ट्रीय शतक नक्कीच झळकावू शकतो.