IND vs ENG 2nd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी सामन्याच्या दुसऱ्या डावात टी-ब्रेक झाला आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर यजमान टीम इंडियाने (Team India) 8 विकेट गमावून 221 धावा करत दुसऱ्या डावात धावांत आघाडी 416 झाली आहे. टी-ब्रेकची घोषणा झाली तेव्हा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 68 धावा आणि इशांत शर्मा 0 धावा करून खेळत होते. दुसऱ्या सत्रात मोईन अलीने (Moeen Ali) भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि फिरकीपटू कुलदीप यादवला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. विराटने 62 धावा केल्या तर कुलदीप शून्यावर परतला. मोईनने भारताविरुद्ध दुसरी डावात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर जॅक लीने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. यापूर्वी, भारताच्या पहिल्या डावात 329 धावांच्या प्रत्युतरात इंग्लंडचा पहिला डाव 134 धावांवर गडगडला. ज्यामुळे यजमान टीम इंडियाला दुसऱ्या डावात 195 धावांची मोठी आघाडी मिळाली. (IND vs ENG 2nd Test: Chepauk वर चालू सामन्यात रोहित शर्मा आणि रिषभ पंतच्या 'Bromance'चा व्हिडिओ व्हायरल, पहा मजेदार Video)
तिसऱ्या दिवसाच्या खराब सुरुवातीस विराट अश्विनच्या सातव्या विकेटसाठी 96 धावांच्या भागीदारीने संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. एकेवेळी 106 धावांवर 6 विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाने विराट-अश्विनच्या जोरावर दोनशेपार मजल मारली. यादरम्यान, कर्णधार कोहलीने झुंजार अर्धशतक लगावलं आणि अश्विनसह संघाचा डाव सावरला. विराटपाठोपाठ अश्विनने देखील शानदार अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, दोंघांमधील भागीदारी शंभरीच्या जवळ पोहचली असताना मोईन अलीने कोहलीला 62 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. कुलदीप यादव 3 धावांवर बाद करत कुलदीपने यजमानास संघाला आठवा झटका दिला. यापूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाने पहिल्या सत्रात 5 विकेट स्वस्तात गमावल्या. पुजारा, रोहित शर्मानंतर रिषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेल स्वस्तात परतले.
दरम्यान, भारताकडून पहिल्या डावात रोहितने 161 धावांची दमदार दीडशतकी भागीदारी करत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रहाणेने 67 आणि पंतने नाबाद 58 धावांचे योगदान दिले. अश्विनने पहिल्या डावात 23.5 ओव्हरमध्ये गोलंदाजी करत 43 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या.