"जार्वो 69" नावाचा स्थानिक चाहता लॉर्ड्सवर (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test Day 3: भारताच्या (India) इंग्लंडविरुद्ध (England) सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी दरम्यान, शनिवारी लंडनच्या लॉर्ड्स (Lords) येथे खेळ सुरु असताना तिसऱ्या दिवशी ‘विराटसेने’चा 12 वा खेळाडू म्हणून एका ब्रिटिश व्यक्तीने मैदानात धाव घेतली आणि काही मिनिटांसाठीच का होईना सर्वांचे लक्ष वेधले. दुसऱ्या सत्रात पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर स्थानिक चाहत्याने टीम इंडियाच्या पांढऱ्या जर्सीत खेळपट्टीवर प्रवेश केला. लॉर्ड्सचे सुरक्षा रक्षक "जार्वो 69" नावाच्या व्यक्तीला मैदानाबाहेर घेऊन जात असताना, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) या संपूर्ण घटनेवर हसू फुटले. त्यावेळी इंग्लंड पहिल्या डावात 216/3 धावसंख्येवर होते. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सच्या मैदानावर Joe Root याचा जलवा, 22 व्या टेस्ट शतकाने घातली एक नाही तब्बल 6 मोठ्या विक्रमांना गवसणी)

स्काय स्पोर्ट्सवर इंग्लंडचे माजी फलंदाज मायकल एथरटन म्हणाले, “गोऱ्यांमधील काही यादृच्छिक व्यक्तीने भारतीय खेळाडूंसोबत खेळपट्टीवर मैदानात उतरला आणि तो जणू कसोटी सामन्यात भाग घेणार असे दिसेल.” दुसऱ्या सत्रादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने  भारताविरुद्ध मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले. रूटच्या कारकिर्दीतील हे 22 वे कसोटी शतक होते. चहापानापर्यंत इंग्लंडने 314/5 धावांपर्यंत मजल मारली होती. तर रूट नाबाद 132 आणि मोईन अलीने त्याला 20 धावांवर साथ देत होता. रूट आणि सहकारी जॉनी बेअरस्टो यांनी 121 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि लंच ब्रेकनंतर सिराजने 57 धावांवर यष्टीरक्षकला पॅव्हिलियनमध्ये पाठ्वत ही भागीदारी मोडली.

इंग्लंड संघ संकटात असताना कर्णधार फलंदाजीसाठी आला होता. शुक्रवारी सिराजने डॉम सिब्ली आणि हसीब हमीदला लागोपाठ चेंडू काढल्यावर बाद केले. यामुळे ब्रिटिश संघाची स्थिती 2/23 अशी झाली पण रूट आणि बेअरस्टोने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. दुसरीकडे, भारताविरुद्ध नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज येथे रुट पावसाने बाधित सामन्यात अर्धशतक ठोकणारा एकमेव ब्रिटिश फलंदाज होता. रूटने पहिल्या डावात 64 तर दुसऱ्या डावात 109 धावा ठोकल्या होत्या.