IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंडमध्ये (England) अनुभवी फलंदाजांचे पाय अनेकदा स्विंग चेंडूंसमोर डगमगताना दिसले आहेत. पण रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल यांनी इंग्लंड मालिकेत आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी केली आहे ती खरोखर कौतुकास्पदआहे. नॉटिंगहम कसोटीच्या पहिल्या डावात 37.3 ओव्हर टिकणारी भारतीय सलामी जोडी लॉर्ड्स (Lords) वरही क्रीजवर अडिग राहिली. लॉर्ड्सवर ढगाळ वातावरण होते, चेंडू स्विंग होत होता पण रोहित आणि राहुल अडचणीत दिसले नाही. दोन्ही फलंदाजांनी भारतीय संघाला लंचपर्यंत 46 धावांपर्यंत पोहचवले. दुपारच्या जेवणापर्यंत खेळात रोहितने सर्वांना खूप प्रभावित केले. विशेषतः सॅम कुरन (Sam Curran) विरोधात त्याने चांगली बॅटिंग केली. (IND vs ENG 2nd Test Day 1: ‘हिटमॅन’ रिटर्न्स! लॉर्ड्सवर Rohit Sharma चा धमाका; विराट, पुजारालाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवले)
सामन्याच्या 15 व्या षटकात सॅम कुरानचे जे हाल झाले ते नक्कीच त्याला मागे टाकू इच्छित असेल. 15 व्या षटकात सॅम कुरनच्या गोलंदाजीवर रोहितने चौकारांचा पाऊस पाडला. सॅम कुरन रोहितसमोर पूर्णपणे असहाय्य दिसत होता पण, ‘हिटमॅन’ने गोलंदाजावर दया केली नाही आणि षटकाच्या पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूमध्ये चौकार खेचले. लाल चेंडूच्या खेळात रोहितच्या खेळावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात होते, पण या मालिकेत त्याने हे दाखवून दिले आहे की तो कसोटी सलामीवीर म्हणून खूप धावा करण्यात सक्षम आहे. सॅम कुरन बॉल स्विंग करण्यासाठी ओळखला जातो आणि घरच्या परिस्थितीमध्ये तो अधिक धोकादायक सिद्ध होतो. पण रोहितने कुरनच्या खराब चेंडूंचा पुरेपूर फायदा घेतला आणि एकाच षटकात चार चौकारासह त्याने एकूण 10 चेंडूत 5 चौकार लगावले.
रोहितने कुरनच्या केलेल्या या धुलाईवर यूजर्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स मिम्स बनवत आहेत, तर काही लोक या 23 वर्षीय गोलंदाजाला कमेंटद्वारे ट्रोल करत आहेत.
सॅम कुरन भावाला काढू नये म्हणजे मिळवलं...
Bus england humare Sam Curran bhai ko nikaal na de -:) https://t.co/ycNnNyZum8
— Abhishek (@AwadhiGuy) August 12, 2021
सॅम कुरन
Sam Curran To #RohitSharma 😂 pic.twitter.com/pGBUnJeHDf
— Yaswanthᴿᵃᵈʰᵉˢʰʸᵃᵐ💞 (@ParlaYaswanth) August 12, 2021
कुरनकडून बाल अत्याचार प्रकरणाची नोंद!
A child abuse case is reported at lords by Sam Curran against @ImRo45 🤷🏼#RohitSharma #INDvENG pic.twitter.com/h9jcUVBgtE
— Manikanta Varma 😉😉😉 (@Manikanta141999) August 12, 2021
रोहित सॅम कुरनला हाताळत आहे
Rohit dealing Sam Curran 😂 @ImRo45 #ENGvIND 4,4,0,4,4,0 in Test Match pic.twitter.com/5u1ubOMBqD
— Patel Vivek (@vivek06298) August 12, 2021
एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये जोमाने फलंदाजी करणारा रोहित शर्मा इंग्लंड कसोटी मालिकेत अप्रतिम बचावात्मक खेळ करताना दिसला आहे. रोहित शर्माने नॉटिंगहम कसोटीत 107 चेंडू खेळत 36 धावा केल्या होत्या. पहिला नॉटिंगहम कसोटी सामना अनिर्णित राहिल्यावर आता लॉर्ड्स कसोटी सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धारित असेल.