IND vs ENG 2nd Test Day 1: ‘हिटमॅन’ रिटर्न्स! लॉर्ड्सवर Rohit Sharma चा धमाका; विराट, पुजारालाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवले

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी ओपनर रोहित शर्माने 13वे कसोटी अर्धशतक झळकावले आहे. रोहितने 83 चेंडूंचा सामना करत 11 चौकार व एका षटकार खेचला. ‘क्रिकेटच्या पंढरी’त 27 कसोटी शतके करणारा विराट कोहली लॉर्ड्सवर नेहमीच फ्लॉप ठरला आहे. तसेच पुजाराने लॉर्ड्सवर खेळलेल्या 4 डावांमध्ये केवळ 89 धावा केल्या आहेत.

IND vs ENG 2nd Test Day 1: ‘हिटमॅन’ रिटर्न्स! लॉर्ड्सवर Rohit Sharma चा धमाका; विराट, पुजारालाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवले
रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर (Lord's Cricket Ground) सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा (Team India) अनुभवी ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharm) 13वे कसोटी अर्धशतक झळकावले आहे. रोहितने 83 चेंडूंचा सामना करत 11 चौकार व एका षटकारासह  कारकिर्दीत पहिल्यांदा इंग्लंडमध्ये पहिले अर्धशतक झळकावले आहे. रोहित नॉटिंगहम कसोटीच्या पहिल्या डावात 107 चेंडूत 36 धावा करून बाद झाला होता. क्रीजवर स्थिरावल्यानंतर त्याने आपली विकेट गमावली होती, पण लॉर्ड्सवर रोहित खेळपट्टीवर फक्त स्थिरावलाच नाही, तर अर्धशतकही केले. नॉटिंगहम प्रमाणे रोहितने लॉर्ड्सवर देखील संयमी सुरुवात केली. त्याने अँडरसन आणि ऑली रॉबिन्सनच्या स्विंग बॉल्सचा चांगला सामना केला. सॅम कुरनच्या एकाच षटकात चार चौकार खेचत रोहितने आपले इरादा स्पष्ट केला आणि इंग्लंडमधील कसोटी कारकिर्दीतील पहिले व तेरावे अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे लॉर्ड्स मैदानावर रोहितचा हा पहिलाच सामना आहे.  (IND vs ENG 2nd Test Day 1: विराट कोहलीने लॉर्ड्स कसोटीसाठी निवडला)

दरम्यान, भारताला उत्तम सुरुवात करुन देत रोहितने आक्रमक खेळी करत केएल राहुलने संयमी खेळ करत संघाला शंभरी पार नेले. ‘क्रिकेटच्या पंढरी’त भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर टीम इंडियाच्या दिग्गज फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. 27 कसोटी शतके करणारा विराट कोहली (Virat Kohli) लॉर्ड्सवर नेहमीच फ्लॉप ठरला आहे. लॉर्ड्सवर कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या फक्त 25 आहे. पण रोहितने गुरुवारी लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी हे दाखवून दिले. विराट कोहलीने लॉर्ड्सवर खेळलेल्या 4 डावांमध्ये केवळ 65 धावा केल्या आहेत. तसेच चेतेश्वर पुजाराने (Cheteshar Pujara) लॉर्ड्सवर खेळलेल्या 4 डावांमध्ये केवळ 89 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, आजच्या सामन्यात शतकी खेळीसह रोहितने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहितने 66 धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत त्याने दोन माजी भारतीय, मन्सूर अली खान पतौडी आणि सय्यद किरमानी, यांना मागे टाकले. किरमानी यांनी 2759 तर पतौडी यांनी 2759 कसोटी धावा केल्या आहेत. अशाप्रकारे रोहितने त्यांच्या पुढे जात 2,800 पेक्षा अधिक कसोटी धावा आतापर्यंत ठोकल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2021 08:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).