रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 1: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघातील दुसऱ्या चेन्नई टेस्टच्या (England Test) पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून यजमान संघाने दिवसाखेर 6 विकेट गमावून 300 धावांपर्यंत मजल मारली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) तुफानी दीडशतकी भागीदारीनंतर इंग्लंड गोलंदाजांनी संघाला सामन्यात कमबॅक करून देत दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्ध्या टीम इंडियाला तंबूत पाठवलं होतं. पहिल्या दिवशी भारताकडून पहिले फलंदाजी करत रोहितने दीडशतकी धावसंख्या पार करत सर्वाधिक 161 धावा केल्या तर रहाणे 67 धावा करून माघारी परतला. चेतेश्वर पुजाराने 21 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली (Moeen Ali) आणि जॅक लीच (Jack Leech) यांना प्रत्येकी 2 तर ओली स्टोन आणि जो रूटला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताकडून रिषभ पंत 33 धावा आणि अक्षर पटेल 5 धावा करून खेळत होते. (IND vs ENG 2nd Test 2021: Virat Kohli याला नडले ‘हे’ गोलंदाज, होम ग्राउंडमध्ये Golden Duck वर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता)

भारतीय संघासाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. लीचने आपल्या पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्याच चेंडूवर गिलला पायचीत करत शून्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर, रोहित आणि पुजराने 83 धावांची भागीदारी करत संघाला डाव सावरला, पण लीचने यजमान संघाला दुसरा झटका देत पुजाराला बेन स्टोक्सच्या हाती कॅच आऊट केलं. कर्णधार विराट कोहली देखील रोहितला साथ देऊ शकला नाही. फिरकीपटू मोईन अलीने विराटला बोल्ड करत शून्यावर परतीचा मार्ग दाखवला. मात्र, नंतर रोहित आणि रहाणेने जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेतला. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी रोहित-रहाणेमध्ये चौथ्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारीने संघाला द्विशतकी धावसंख्या पार करून दिली. यादरम्यान रोहितने झुंजार शतक पूर्ण केलं. रहाणेने देखील रोहितला चांगली साथ दिली आणि आक्रमक फलंदाजी करत तिसऱ्या सत्रात अर्धशतक पूर्ण केलं त्यानंतर, रोहितने 207 चेंडूत आपले 150 धावा पूर्ण केल्या. रोहितने आपल्या दीडशतकी खेळी 18 चौकार आणि 2 षटकार तर रहाणेने 9 चौकार लगावले. अश्विनने 13 धावा केल्या.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने पहिला सामना जिंकला असून यजमान भारतीय संघाविरुद्ध 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत, कोहलीसेना दुसर्‍या सामन्यात विजय मिळवून बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल.