विराट कोहली (Photo Credit: IANS)

IND vs ENG 2nd Test 2021: भारताविरुद्ध (India) इंग्लंडने (England) चेन्नई (Chennai) येथे सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात शानदार सुरुवात केली आणि 86 धावसंख्येवर टीम इंडियाला (Team India) 3 झटके देत संघावर दबाव आणण्यास सुरवात केली आहे. टीम इंडियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दिवसाच्या सुरुवातीलाच पहिला धक्का शुभमन गिलचा रूपात बसला. गिल खातेही उघडू शकला नाही आणि ओव्हरच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये पॅव्हिलियनमध्ये परतला. जॅक लीचने वैयक्तिक 21 धावांवर चेतेश्वर पुजाराला माघारी धाडलं. पुजारा पाठोपाठ विराट देखील माघारी परतला. मोईन अलीने (Moeen Ali) विराट कोहलीला भोपळा फोडू न देता आपल्या शानदार फिरकी चेंडूने क्लीन बोल्ड करत 'गोल्डन डक' वर माघारी धाडलं. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात कोहली खाते न उघडताच बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. मात्र, विराट भारतात शून्यावर आऊट होण्याची ही पहिली वेळ नाही. (IND vs ENG 2nd Test 2021: सचिन तेंडुलकरच्या पावलावर Virat Kohli चे पाऊल, 150व्या टेस्ट डावात पाहायला मिळाला अनोखा योगायोग)

इंग्लंडच्या मोईन अलीपूर्वी कोहलीला भारतात खेळत तीन गोलंदाजांनी भोपळा फोडू न देता परतीचा मार्ग दाखवला आहे. विशेष म्हणजे हे सर्व वेगवान गोलंदाज असून मोईन पहिला फिरकी गोलंदाज ठरला. अलीपूर्वी, 2017 मध्ये कोलकाता कसोटी दरम्यान श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलने पहिल्यांदा विराटला शून्यावर बाद केले आहे. लकमल व्यतिरिक्त 2017 पुणे टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, 2019 मध्ये इंदोर कसोटी दरम्यान बांग्लादेशी वेगवान गोलंदाज अबू जायदने भारतात खाते न उघडता त्याला पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला आहे. विराट बाद झाल्यावर रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान, 'हिटमॅन'ने सातवे कसोटी शतक पूर्ण केले. विराटने पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सामन्यात झुंजार अर्धशतकी खेळी करत अपेक्षा वाढवल्या होत्या, मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार अपयशी ठरला. विराटने 2019 नंतर एकही आंतरराष्ट्रीय शतक करू शकलेला नाही त्यामुळे चाहते चाहते जुन्या 'रनमशीन'ची झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, कोहलीने आपल्या आजवरच्या कसोटी कारकिर्दीत 88 टेस्ट सामन्याच्या 149 डावात 53.2 च्या सरासरीने 7401 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 27 शतके आणि 24 अर्धशतके झळकावली आहेत. कसोटी क्रिकेटमधील कोहलीची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 254 आहे.