IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई येथे दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) मैदानात उतरली आहे. आजपासून सुरु झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, संघाची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. सामन्याच्या आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लड फिरकीपटू ओली स्टोनने शुभमन गिलला माघारी धाडलं. गिल भोपळाही फोडू शकला नाही आणि स्टोनच्या चेंडूवर पायचीत होऊन माघारी परतला. संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याने मैदानावर असलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारावर दबाव वाढणार असे दिसत होते मात्र. 'हिटमॅन'ने कोणतेही प्रेशर न घेतला आक्रमक फलंदाजी केली. यादरम्यान, 'हिटमॅन' रोहितने एक शानदार कव्हर ड्राइव्ह शॉट खेळला ज्याने स्टेडियमवर उपस्थतीत प्रेक्षकच नाही तर स्वतः कर्णधार कोहलीलाही सुपर इम्प्रेस केलं. बीसीसीआयने (BCCI) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितच्या या शानदार शॉटनंतर विराट आपल्या सहकारी खेळाडूसाठी टाळ्या वाजवताना दिसला. (IND vs ENG 2nd Test: 'विराटसेने'ची एक चुक पडू शकते भारी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल तिकीट मिळवण्याचे स्वप्न मिळेल धुळीस)
दरम्यान, रोहितला दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली ज्याचा फायदा घेत त्याने अर्धशतकी धावसंख्या पार केली. जॅक लीचचा चेंडूवर सलग दोन चुकार खेचत रोहितने पन्नासी गाठली. शर्माने 46 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. दिवसाआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेनुसार पूर्ण तंदुरुस्त असलेल्या अक्षर पटेलचे कसोटी पदार्पण झाले असून तो भारताचा 302वा कसोटी कॅप धारक ठरला आहे. शिवाय, कुलदीप यादवला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी भारतीय इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तसेच वर्क लोड हलके करण्यासाठी जॅस्परीट बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा नायक मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.
Delectable drive from @ImRo45 👌
Applause from #TeamIndia skipper @imVkohli 👏
Loud cheer from the Chepauk crowd 👍
Watch that moment 🎥👉 https://t.co/rilK59Ik2n@Paytm #INDvENG pic.twitter.com/7xdkGB0xkF
— BCCI (@BCCI) February 13, 2021
इंग्लंडने सामन्याच्या दिवसापूर्वी 12 खेळाडूंची घोषणा केल्यानंतर जखमी जोफ्रा आर्चरच्या जागी अनुभवी ऑली स्टोनची निवड करण्याचा निर्णय घेतला. बेन फोक्स जोस बटलर, डॉम बेससाठी मोईन अली आणि जेम्स अँडरसनच्या स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश झाला आहे.