Virat Kohli Surpasses Graeme Smith: भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध पुणे येथे सुरु असलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी दरम्यान कर्णधार म्हणून वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठ्या विक्रमाची नोंद केली. कोहलीने इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्या वनडे सामन्यात 41 धावांची खेळी केली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथचा (Graeme Smith) विक्रम मोडला. विराट आता वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. स्मिथने 150 सामन्यात कर्णधारपदावर राहत 5416 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यापूर्वी कोहलीच्या नावावर वनडेमध्ये कर्णधार म्हणून 5376 धावांची नोंद होती. (IPL 2021: विराट कोहली याच्यासोबत Rajasthan Royals संघाच्या युवा खेळाडूला करायचाय ‘बिहू’ डान्स)
ऑस्ट्रेलियाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पॉन्टिंगने कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. कर्णधारपदी राहत रिकी पाँटिंगने 230 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8497 धावा केल्या आहेत. यांनतर कर्णधार म्हणून सर्वाधिक वनडे धावांच्या यादीत पॉन्टिंगनंतर भारताचा महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने 200 एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून 6,641 धावा केल्या आहेत. शिवाय कोहली देखील वनडे कर्णधार म्हणून पॉन्टिंगच्या 22 शतकांची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. इतकंच नाही तर पॉन्टिंगच्या 71 शतकांची देखील तो बरोबरी करेल जेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त, दुसर्या वनडे सामन्यात कोहलीने जर तिहेरी धावसंख्या गाठली तर तो घरच्या मैदानावर बहुतेक एकदिवसीय शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करेल. सचिनने भारतात 20 तर कोहली 19 शतकांसह त्याच्या मागे आहे. 32 वर्षीय विराटने 8 मार्च, 2019 रोजी रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेर एकदिवसीय शतक झळकावले होते.
दरम्यान, टीम इंडिया इंग्लंडविरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका गुंडाळण्याच्या आणि कोविडनंतर काळात पहिली वनडे मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, यापूर्वी पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने वैयक्तिकरित्या अनेक विक्रम केले. आपल्या 56 धावांच्या खेळीदरम्यान कोहलीने भारतीय भूमीवर 10,000 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी फक्त सचिन तेंडुलकर आपल्या भूमीवर हा पराक्रम करू शकला होता.