IND vs ENG 2nd ODI 2021: 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन झाल्यापासून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) सर्वात यशस्वी सलामीची भागीदारी ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील गेल्या दशकात भारताच्या जबरदस्त यशात रोहित-शिखरची दमदार भागीदारी एक मोठे कारण सिद्ध झाली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीची तुलना सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) शानदार सलामी जोडीशी केली गेली आहे आणि शुक्रवार, 26 मार्च रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध (England) दुसर्या एकदिवसीय सामन्यात या दोघांना भारताच्या महान सलाम जोडीची बरोबरी करण्याची सुवर्ण संधी आहे. रोहित आणि शिखरच्या जोडी एकदिवसीय सामन्यात 4,911 धावा केल्या असून आणि शुक्रवारी पहिल्या विकेटसाठी 89 धावा करताच वनडेमध्ये 5,000 धावा करणारी दुसरी भारतीय जोडी ठरेल. (IND vs ENG 2nd ODI 2021: दुसऱ्या वनडेत ‘गब्बर’ शिखर धवनला मोठा विक्रम करण्याची संधी, ‘ही’ कामगिरी करणारा बनेल तिसरा वेगवान फलंदाज)
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये 5,000 धावांचा टप्पा सर करणारी सचिन आणि गांगुलीची जोडी पहिली होती. गांगुली आणि तेंडुलकर यांनी 176 डावात एकत्र फलंदाजी केली आणि 8,227 धावांची भागीदारी केली. श्रीलंकेची महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा त्यांच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित आणि शिखर 5,000 धावा करणारी 7वी जोडी ठरेल. रोहित-शिखर जोडीने 45.05 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, तर सचिन-गांगुलीच्या 176 डावात 47.55 च्या सरासरीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे रोहितने कर्णधार विराट कोहली सोबत देखील 5,000 च्या जवळ भागीदारीने धावा केल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू फॉर्मेटमध्ये चांगले काम करत रहावेत आणि 2023 आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत घरच्या मैदानावर संघाच्या विजयात मोलाची कामगिरी करावी अशी भारताची इच्छा आहे.
दरम्यान, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर इंग्लंडचा प्रभारी कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीला बोलावले. शिवाय, संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत तर भारतीय इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. इंग्लिश संघासाठी सॅम बिलिंग्सच्या लियाम लिविंगस्टोनने वनडे पदार्पण केले तर इयन मॉर्गनच्या जागी डेविड मलान आणि मार्क वूडच्या रीस टोपलीला खेळण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, टीम इंडियामध्ये श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतचा समावेश झाला आहे.