IND vs ENG 2021 Series: भारतीय संघ (Indian Team) सध्या इंग्लंडच्या दौर्यावर (England Tour) आहे. या दौर्यावर टीम इंडिया (Team India) पाच कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे. या मालिकेमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा दुसरा हंगामही सुरु होणार आहे. भारताने गेल्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली होती, जिथे न्यूझीलंड संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2018 नंतर टीम इंडियाचा हा पहिला इंग्लंड दौरा असून या मालिकेत अनेक दिग्गजांवर नजर असणार आहे. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) या मालिकेपूर्वी मोठी घोषणा केली आहे. तो म्हणाला आहे की भारताचा स्टार ऑफस्पिनर आर अश्विन आगामी कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी (Team India) ट्रम्प कार्ड सिद्ध होईल. (IND vs ENG 2021: इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी ‘विराटसेने’ला मोठा धक्का, पृथ्वी शॉ- सूर्यकुमार यादव यांच्यासाठी ब्रिटन दौरा होऊ शकतो रद्द)
ESPNCricinfo च्या आपल्या कॉलममध्ये स्टेनने लिहिले की, “ही कदाचित बॉक्सबाहेरची विचारसरणी असू शकेल, पण मला वाटतं की जेव्हा आर अश्विनसारखा एखादा खेळाडू भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकत असताना आपण गोलंदाजांवर खूप जोर देत असतो. या पाच सामन्यांची कसोटी मालिका जसजशी पुढे जाईल, मला वाटते की फिरकीमुळे बदल होईल.” पुढे त्याने लिहिले की, “अश्विन हा एक गोलंदाज आहे जो बरीच ओव्हर गोलंदाजी करतो. वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती असताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघ खेळण्याइतके चांगले आहेत, पण ते विशेषतः स्पिन चांगले खेळत नाहीत. म्हणून अश्विन या मालिकेत भारतासाठी सर्वात मोठा ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो.”
Which bowler will be the biggest key for 🇮🇳 in the Test series in England? @DaleSteyn62 believes it could be @ashwinravi99 👉 https://t.co/VkSSTJbylE #OnTheBall pic.twitter.com/1miXP63y5V
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 29, 2021
दरम्यान, स्टेनने पुढे लिहिले आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना उपयुक्त होती तरी अश्विनने त्या अंतिम सामन्यात निराश केले नाही. अश्विनने 79 कसोटी सामन्यांमध्ये 24.56 च्या सरासरीने 413 विकेट्स काढल्या आहेत. तसेच अश्विन गोलंदाजी सोबत बॅटने देखील संघाला सखोलता प्रदान करतो. कसोटीत अश्विनने 5 शतके आणि 11 अर्धशतकांसह आतापर्यंत एकूण 2685 धावा केल्या आहेत.