IND vs ENG 2021: बीसीसीआयने शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान या जखमी त्रिकुटाची बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांच्या नावांची घोषणा केली. या आठवड्यात यादव आणि शॉ श्रीलंकेहून इंग्लंड दौऱ्याला (England Tour) रवाना होण्यासाठी सज्ज देखील होती पण अष्टपैलू कृणाल पांड्या (Krunal Pandya) कोविड-19 आढळल्यामुळे त्यांची इंग्लंडला (England) जाण्याची योजना धोक्यात आली आहे. तसेच दोघे बुधवारी श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी-20 सामना देखील खेळले नाही. यादव आणि शॉ सध्या आयसोलेशनमध्ये असून लवकरच ब्रिटनला रवाना होण्याची त्यांची शक्यता संशयाच्या भोवऱ्यात आहे. याशिवाय इंग्लंड सरकारचे कठोर कोविड-19 प्रोटोकॉलमुळेही (England COVID Protocol) दोघांना देशात प्रवेश दिला जाऊ शकणार नाही. 4 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय व्यवस्थापनासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. (IND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी)
गुरुवारी (29 जुलै) बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकारी शॉ आणि यादव यांच्या बदली जाहीर करण्याच्या टीमच्या योजनेबद्दल InsideSport शी बोलले. “आम्ही या टप्प्यावर निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही. नवीन बदली घोषित करायची की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी आम्हाला पुढील काही दिवस पाळले पाहिजे,” बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले. शॉ आणि यादव या दोघांनी तीन एकदिवसीय सामन्यांत भारतासाठी शानदार प्रदर्शन केले. त्यामुळे भारतीय व्यवस्थापनाने हे दोघे लयीत असल्याचे वाटले आणि बदली खेळाडू म्हणून त्यांची घोषणा केली. इंग्लंडमधील प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने, सरकारने कठोर नियम आणि देशात प्रवेश करणार्यांना निर्बंध घालण्यासाठी भाग पाडले आहे.
शॉ आणि यादव यांना श्रीलंकेहून पाठवले गेले तर त्यांना यूकेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दहा दिवस स्वत:ला क्वारंटाईन करावे लागेल. आणि या नियमानुसार दोघांना नंतर 6 ऑगस्टपर्यंत कोलंबोमध्ये मुक्काम करावा लागेल आणि त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी दोघे ब्रिटनसाठी रवाना होऊ शकतात. इतकंच नाही तर ब्रिटनमध्ये दाखल झाल्यावर देखील इंग्लंड सरकारने श्रीलंका आणि भारतीय प्रवाशांसाठी कठोर नियमांमुळे दोघांना 10 दिवस पुन्हा क्वारंटाईन व्हावे लागेल. या प्रक्रियेतच शॉ आणि यादव कमीतकमी पहिल्या तीन कसोटी सामन्यांना मुकतील. त्यामुळे आता बीसीसीआयपुढे त्यांची बदली खेळाडूंची निवड करण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.