IND vs ENG 2nd ODI 2021: भारताविरुद्ध (India) तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर 0-1 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड (England) संघाला आगामी दुसऱ्या सामन्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघाचा कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि फलंदाज सॅम बिलिंग्ज (Sam Billings) यांना पहिल्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली ज्यामुळे दुसर्या वनडे सामन्यात दोघांच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 66 धावांनी धुव्वा उडवत आघाडी घेतली आहे. शिखर धवनच्या 98 धावा आणि क्रुणाल पांड्याच्या आतिशी नाबाद 58 धावांच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) 317 धावांचा डोंगर उभारला होता. कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनीही अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा डाव 42.1 ओव्हरमध्ये 251 धावांत आटोपला. (IND vs ENG 1st ODI 2021: धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड, Krunal Pandya याचा विश्वविक्रम, पुण्यात टीम इंडियाने पडला विक्रमांचा पाऊस)
कर्णधार मॉर्गनच्या उजव्या हाताच्या अंगठा व बोटाला दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याला चार टाके घालावे लागले. “आम्ही 48 तास प्रतीक्षा करीत आहोत आणि ते कसे आहे ते पाहूया...शुक्रवारी उपलब्ध होण्यास अपेक्षेइतका वेळ द्या,” मॉर्गन सामन्यानंतर म्हणाला. भारताने दिलेल्या 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी 22 धावा करणारा मॉर्गन म्हणाला की दुखापतीमुळे त्याची फलंदाजी 100 टक्के होणार नाही आणि क्षेत्ररक्षणदेखील विभाजित वेबबिंगमुळे चिंताजनक आहे. बिलिंग्स देखील 18 धावाच करू शकला. "सॅमशी मी त्याच्या फलंदाजीबद्दल बोललो नाही म्हणून मला त्याच्या उदाहरणावरून माहित नाही...माझ्यामते हे कधीही 100 टक्के होणार नाही पण मी फलंदाजी करू शकत नाही असे नाही,” मॉर्गन म्हणाला. दरम्यान, 0-1 ने पिछाडीवर असणाऱ्या विश्वविजेत्या इंग्लंड संघाला आता शुक्रवारी दुसर्या सामन्यात विजय आवश्यक आहे.
मॉर्गन म्हणाला की, बहुतेक खेळाडूंना संधी देतील म्हणजेच मॅट पार्किन्सन, रीस टोपली आणि अनकॅप्ड लियाम लिव्हिंगस्टोनचा आगामी सामन्यात समावेश होऊ शकतो. "वनडे क्रिकेट आमचे संघ वाढवण्याचे आणि मैदानावरील आपल्या सर्वोत्तम इलेव्हनच्या पलीकडे सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याचे साधन ठरले आहे. त्यामुळे येणाऱ्या मुलांसाठी संधी असेल," मॉर्गन म्हणाला.