IND vs ENG 1st Test Day 2: द्विशतकी Joe Root याचा चेन्नईत वर्ल्ड रेकॉर्ड, पहा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड बनलेले हे प्रमुख रेकॉर्ड
जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 1st Test Day 2: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघादरम्यान चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी हा खेळ संपुष्टात आला आहे. दुसऱ्या दिवसाखेर पाहुण्या संघाने पहिल्या डावात 8 विकेट गमावून 555 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डोम बेस 28 आणि जॅक लीच 6 धावा करून खाल्लेत होते. कर्णधार जो रूट (Joe Root) आज 218 धावांची संयमी द्विशतकी खेळी करत माघारी परतला. त्याने आपल्या शानदार खेळीत 377 चेंडूंचा सामना करत 19 चौकार आणि दोन षटकार ठोकले. रूटशिवाय सलामीवीर डोम सिब्लीने 87 धावा आणि उपकर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) 82 धावांची शानदार फलंदाजी केली. सामन्यादरम्यान बरेच रेकॉर्ड्स बनले जे खेलीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 1st Test 2021: जो रुटने ठोकले धमाकेदार दुहेरी शतक, पण कर्णधार MS Dhoni याचा 'हा' रेकॉर्ड अद्यापही बाधित)

1. चेन्नई कसोटीत जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले.

2. कसोटी करिअरच्या 100व्या सामन्यात द्विशतक करणारा रूट पहिलाच खेळाडू ठरला.

3. कसोटी क्रिकेटमध्ये सलग दीडशे प्लेस धावा करणारा रूट सातवा फलंदाज ठरला. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक 150 धावा करण्याचा विक्रम आहे. 2007 मध्ये संगकाराने सलग चार वेळा 150 किंवा धावांचा टप्पा गाठला होता.

4. रूटने आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील 98 व्या, 99 व्या आणि 100 व्या सामन्यात सलग शतके केली आहेत. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे.

5. रूट चेन्नईत 218 धावा करुन बाद झाला आणि या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू ठरला. रूटच्या आधी हा खास विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू डीन जोन्सच्या नावावर होता ज्यांनी 1986 मध्ये 210 धावा केल्या होत्या.

6. भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्समध्ये डेरेक अंडरवुडला मागे टाकले आहे. अंडरवुडने कसोटी क्रिकेटमध्ये 297 विसकट घेतले असून इशांतच्या नावावर आता 299 टेस्ट विकेट झाले आहे.

7. बेन स्टोक्स 82 धावा करून शहबाज नदीमचा बळी ठरला. स्टोक्सच्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीचे हे 23वे अर्धशतक होते.

दरम्यान, भारतासाठी जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि शाहबाज नदीम यांनी अनुक्रमे दोन गडी बाद केले आहेत. बुमराहने डोम सिब्ली आणि डॅन लॉरेन्सला परतीचा मार्ग दाखविला तर इशांतने जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांना सलग चेंडूवर पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. रविचंद्रन अश्विनने रोरी बर्न्स आणि ओली पोपला कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स शाबाझ नदीमचे शिकार बनले.