IND vs ENG 1st Test 2021: इंग्लंडचा (England) कर्णधार जो रूटने (Joe Root) भारताविरुद्ध (India) चेन्नई टेस्ट (Chennai Test) सामन्याच्या पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीचे 5वे द्विशतक असून गेल्या तीन कसोटी सामन्यांमधील हे त्याचे दुसरे दुहेरी शतक आहे. भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम (MS Chidambaram) स्टेडियमवर 218 धावांचा डाव खेळला पण टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) याच मैदानावरील रेकॉर्ड अद्यापही अबाधित आहे. आपल्या कारकीर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात उतरलेल्या इंग्लिश कर्णधार रूटने दुसर्या दिवशी दुहेरी शतक झळकावले. पहिल्या दिवशी रुट 128 धावांवर नाबाद परतला होता आणि दुसऱ्या दिवशी 218 धावा करून माघारी परतला. रूटने आपल्या द्विशतकी डावात 377 चेंडूत 19 चौकार आणि 2 षटकार ठोकले. (IND vs ENG 1st Test 2021: Rohit Sharma याने हरभजन सिंहच्या गोलंदाजीची केली नक्कल, पाहून तुम्ही देखील व्हाल रोमांचित Watch Video)
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर कर्णधार म्हणून खेळल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाची नोंद माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. रूटने दुहेरी शतक केल्यावर इंग्लंड कर्णधार सहज धोनीच्या धावांच्या पुढे जाईल असे दिसत होते परंतु शाहबाज नदीमने त्याला परत एलबीडब्ल्यू करत माघारी पाठवलं. 2013 मध्ये धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 224 धावा केल्या होत्या आणि 8 वर्षानंतर अद्यापही धोनीचा या मैदानावरील रेकॉर्ड अबाधित आहे. दुसरीकडे, या मैदानावर भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने 319 धावा केल्या तर दुसरा सर्वात मोठा डावही भारतीय फलंदाजाने खेळला आहे. 2016 मध्ये करुण नायरने नाबाद 303 धावा केल्या होत्या. सुनील गावस्कर 236 धावांच्या नाबाद खेळीसह तिसर्या स्थानावर असून या यादीत धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, चेन्नई येथील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ पहिल्या डावात रूटच्या द्विशतकी खेळीच्या मजबूत स्थितीत पोहचला आहे. दुसऱ्या दिवसाखेर संघाने 8 विकेट गमावून 555 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियापुढे मोठं आव्हान तयार केलं.