IND vs ENG 1st Test: इंग्लंड (England) विरोधात नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड खंडित केला आहे. अँडरसनने भारतीय संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलची (KL Rahul) विकेट घेताच कुंबळेच्या 620 कसोटी विकेट्सना मागे टाकले आणि सार्वकालीन सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप-3 मध्ये एंट्री घेतली. राहुलने 84 धावा काढल्या. अँडरसनच्या नावावर आता 162 कसोटी सामन्यात विकेट्सची नोंद झाली आहे. अनिल कुंबळेने 132 कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक 619 आहेत. (IND vs ENG 1st Test 2021: ‘त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूला बाद करणे...’ कोहलीच्या 'मोठ्या विकेट'वर पाहा काय म्हणाला जेम्स अँडरसन)
दुसरीकडे, जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टेस्ट विकेट्सच्या श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत. मुरलीधरनने 133 सामन्यात 800 कसोटी विकेट्सची नोंद केली आहेत. त्यानंतर या यादीत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नचा क्रमांक लागतो. वॉर्नने 145 सामन्यात दुसऱ्या सर्वाधिक 708 गडी बाद केले आहेत. दरम्यान, जेम्स अँडरसनने सामन्याच्या पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) तंबूत धाडत अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली होते. त्याने 41 व्या ओव्हरच्या सलग दोन चेंडूंत दोन्ही विकेट घेतल्या. तथापि, कुंबळे अवघ्या 132 सामन्यांमध्ये येथे पोहोचला होता, तर अँडरसनने 163 सामन्यात हा कारनामा केला आहे.
James Anderson, at 39, becomes the third-highest wicket-taker in Test cricket 🐐#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/vo874jWePa
— ICC (@ICC) August 6, 2021
अँडरसन हा जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज देखील आहे. अँडरसनचा हा रेकॉर्ड आणखी एक गोष्ट खास बनवते आणि ती म्हणजे हा पल्ला गाठणारा तो पहिला व आतापर्यंत एकमेव वेगवान गोलंदाज आहे. अँडरसनपूर्वी माजी ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅकग्रा यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 563 विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याच्यापुढे दोन फिरकीपटू आहेत. उल्लेखनीय म्हणजे भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत ब्रिटिश संघाला पहिल्या डावात 183 धावांवर गुंडाळले. संघासाठी कर्णधार जो रूटने 64 धावा केल्या होत्या, तर भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेतल्या होत्या.