IND vs ENG 1st Test Day 2 Tea: भारताविरुद्ध (India) चेन्नई (Chennai) येथील पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने (England) टी ब्रेकपर्यंत 4 विकेट्स गमावून 454 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. तर दुसऱ्या सेशनमध्ये 1 विकेट गमावून 99 धावा केल्या. कर्णधार जो रुटने (Joe Root) पुढाकार घेत संघाचे नेतृत्व करत शानदार द्विशतक लगावलं. रूटने 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा पहिला क्रिकेटर ठरला. रूटने पहिल्या दिवशी डॉम सिब्लीसह (Dom Sibley) द्विशतकी तर दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्ससह (Ben Stokes) शतकी भागीदारी करत संघाला पहिल्या डावात मजबूत स्थिती मिळवून दिली. श्रीलंका आणि आता भारताविरुद्ध रुटने सातत्याने शतकी आणि द्विशतकी कामगिरी केली आहे. रुट आणि स्टोक्स यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. स्टोक्सने 118 चेंडूत 10 फोर आणि 3 सिक्ससह 82 धावा केल्या. भारतासाठी जसप्रीत बुमराहने 2 तर अश्विन आणि शाहबाझ नदीमला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (Virat Kohli DRS Woes vs ENG: ‘कोहली रिव्यू सिस्टम भयावह आहे’, 5 चेंडूत 2 DRS वाया, टीम इंडिया कर्णधाराच्या रिव्यूवर Netizensचा चढला पारा)
दुपारच्या जेवणानंतर इंग्लंडने 3 बाद 355 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रूटने 156 आणि स्टोक्सने 63 धावांपासून आपला डाव पुढे नेला. रूट आणि स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. मात्र, नदीमने ही घातक ठरणारी भागीदारी मोडली आणि संघाला मोठी विकेट मिळवून दिली. नदीमने बेन स्टोक्सला चेतेश्वर पुजाराच्या हाती कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. स्टोक्स आऊट झाल्यानंतर पोप आणि रूटने चहापानापर्यंत इंग्लंडला आणखी एक धक्का बसू दिला नाही. टी ब्रेकपूर्वी रुटने अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. रूट षटकार मार्ट द्विशतकी धावसंख्या गाठणारा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे. रूटचे पदरदेशातील तिसरे दुहेरी तर भारताविरुद्ध पहिले ठरले. दुसऱ्या दिवशी रूटने 260 चेंडूत आपले 150 धावा पूर्ण केल्या आणि स्टोक्सने देखील जबाबदारीने खेळत रूटला चांगली साथ दिली.
यापूर्वी, इंग्लंडसाठी सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या. डॅन लॉरेन्स शून्यावर माघारी परतला.