IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई (Chennai) येथील पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय संघाला (Indian Team) मोठा धक्का बसला आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे चेन्नई येथे पहिल्या कसोटी सामन्यातून अष्टपैलू अक्षर पटेलची (Axar Patel) एक्सिट झाली आहे. पटेलच्या जागी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) आणि लेगस्पिनर राहुल चाहर (Rahul Chahar) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी बीसीसीआयने ट्विटरवर माहिती पोस्ट केली. "गुरुवारी टीम इंडियाच्या (Team India) पर्यायी प्रशिक्षण सत्रादरम्यान अष्टपैलूने आपल्या डाव्या गुडघ्यात दुखण्याची तक्रार केली. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाद्वारे त्याचे परीक्षण केले जात आहे आणि त्याच्या सविस्तर अहवालाची प्रतीक्षा करीत असल्याने तो सलामीच्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने फिरकीपटू शाहबाज नदीम आणि राहुल चहरचा भारताच्या संघात समाविष्ट केले आहे. नदीम आणि चाहर हे दोघेही स्टँडबाई गटातील भाग म्हणून टीम इंडियाबरोबर प्रशिक्षण घेत आहेत," बीसीसीआयने निवेदनात म्हटले. (IND vs ENG 1st Test Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील पहिली टेस्ट कधी-कुठे कसे पाहता येणार?)
दुखापतीतून बाहेर पडलेल्या रवींद्र जडेजाच्या जागी अक्षरची निवड करण्यात आली होती. अक्षर अद्याप भारताकडून कसोटी सामना खेळलेला नाही, आणि चेन्नई येथील पहिल्या टेस्ट सामन्यात डेब्यू करण्याच्या तयारीत होता मात्र दुखापतीमुळे त्याचे कसोटी पदार्पण लांबणीवर गेले आहे. भारतीय संघात नव्याने स्थान मिळवलेल्या नदीमने एक कसोटी तर राहुल चाहरने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय टेस्ट खेळलेली नाही. नदीम आणि चाहर दोघेही ‘भारत अ’ संघाचे नियमित सदस्य होते आणि बबलमध्ये भारतीय संघाबरोबर प्रशिक्षण घेत होते. दरम्यान, टीम इंडियासाठी अक्षरने एकही कसोटी सामना खेळला नसला तरी वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. जून 2014 मध्ये बांग्लादेशविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून त्याने आजवर 38 वनडे सामन्यात 45 विकेट्स आणि 181 धावा केल्या आहेत, तर 11 टी-20 सामन्यात 9 विकेट्स आणि 68 धावा केल्या आहेत.
Axar Patel ruled out of first @Paytm #INDvENG Test; Shahbaz Nadeem & Rahul Chahar added to India squad
More details 👉 https://t.co/2uk74iyVpW pic.twitter.com/MpUdUGMauB
— BCCI (@BCCI) February 5, 2021
दरम्यान, अक्षरच्या दुखापतीमुळे पहिल्या टेस्ट सामन्यात इंग्लंडविरुद्ध नदीम आणि चाहरपैकी एकाचा समावेश केला जाऊ शकतो. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल असल्याने टीम इंडिया सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते.