भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात उद्या, 3 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्ही संघातील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल. या मॅचच्या एक दिवस अगोदर कर्णधार रोहित शर्मा याने मोठे विधान करत बांग्लादेशविरुद्ध भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) याच्यावर रिषभ पंत (Rishabh Pant) याला संधी दिली जाईल. घरगुती क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत सॅमसनने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे, त्यामुळे खराब फॉर्ममध्ये असलेल्या पंतच्या जागी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संजू रुजू होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मॅचपूर्वीच्या पत्रकार परिषदेत रोहितने पंतला टी-20 चा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून वर्णन केले. रोहित म्हणाला की त्याला सतत धावा करण्याची गरज आहे. त्याच्याकडे सामना खेचून संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. (IND vs BAN 1st T20I: रोहित शर्मा याला विराट कोहली याची बरोबरी करण्यासह 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड पुन्हा नोंदवण्याची संधी, वाचा सविस्तर)
सामन्यापूर्वी रोहितने प्री-कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये पंतला पाठिंबा दर्शविला आणि म्हणाला की, आमच्याकडे असलेले दोन्ही यष्टिरक्षक खूपच हुशार आहेत, पण आम्ही पंतला प्राधान्य देऊ. याच स्वरुपाने त्याला ओळख दिली आहे. आम्ही त्याला आणखी थोडा वेळ द्यायला हवा, आम्हाला माहित आहे की जर त्याचा दिवस असेल तर तो सामना पुढे घेऊ शकेल." पंतने आतापर्यंत भारतासाठी 20 टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने 20 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत.
टीम इंडियामध्ये विकेटकीपरचे भरपूर पर्याय असल्याचे रोहितने स्पष्ट केले. या सर्वांना समान संधी देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आम्हाला त्या सर्वांपेक्षा उत्कृष्ट दिसू शकेल. रोहित म्हणाला, की इंडियन प्रीमियर लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फरक आहे, दोघांमध्ये वेगवेगळी आव्हाने आहेत. पंत दिल्लीसाठी रणजी क्रिकेट खेळतो आणि हे त्याचे होम ग्राऊंड आहे. बांगलादेश विरुद्ध पहिला टी -20 सामना दिल्ली येथे खेळला जाणार आहे. पंत आयपीएलमध्ये दिल्ली फ्रँचायझी संघासाठी खेळतो. खराब फॉर्म आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारताच्या टेस्ट संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले होते.