IND vs AUS 3rd T20I: यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळालं तेव्हा प्रेक्षक गॅलरीत भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) डुप्लिकेट सामन्याचा आनंद लुटताना दिसला. इतकंच नाही तर जेव्हा कॅमेरामॅनने कोहलीच्या डुप्लिकेटला (Virat Kohli Lookalike) मैदानावरील मोठ्या पडद्यावर दाखवले तेव्हा स्वतः भारतीय कर्णधार त्याचा डुप्लिकेट पाहून चकित झाला. कोहलीच्या डुप्लिकेटचे चित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. सामन्याच्या प्रसारकांनी स्टॅन्डमध्ये कोहलीच्या 'डुप्लिकेट'ला पाहताच कॅमेरा भारतीय चाहत्याकडे वळवला आणि संभाव्य डुप्लिकेट SCG मध्ये उपस्थित चाहत्यांच्या नजरेत भरला. विशेष म्हणजे कर्णधार कोहलीनेसुद्धा SCG येथे मोठ्या पडद्यावर त्याच्या संभाव्य डुप्लिकेटची झलक दाखवताच घटनेची दखल घेतली आणि प्रतिक्रिया दिली. (IND vs AUS 3rd T20I Stats: विराट कोहलीच्या षटकारांचे तिहेरी शतक, ऑस्ट्रेलियात 'हा' पराक्रम करणारा बनला दुसरा भारतीय, पहा सिडनीमध्ये बनलेले प्रमुख रेकॉर्ड)
ऑस्ट्रेलियन डावादरम्यान भारतीय संघाचे मैदानावर नेतृत्व करताना कोहलीने मोठ्या पडद्यावर थोड्यावेळच नजर टाकली असली तरी मोठ्या पडद्यावर आपल्या डुप्लिकेटला पाहून टीम इंडियाचा कर्णधार चक्रावून गेला आणि संपूर्ण एपिसोड दरम्यान विराट त्याच्याकडे एक टक लावून पाहताना दिसला. पाहा हा व्हिडिओ:
आजच्या सामन्याबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलियाने पहिले फलंदाजी करून मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर 5 विकेट गमावून निर्धारित ओव्हरमध्ये 186 धावांपर्यंत मजल मारली. वेडने आणखी एक शानदार खेळी साकारली करत 80 धावा केल्या तर पॉवर-हिटर ग्लेन मॅक्सवेलने आशियाई दिग्गजांविरुद्ध आणखी एक अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात भारताकडून एकट्या कर्णधार विराटने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वाधिक 85 धावा केल्या. अन्य फलंदाज विराटला साथ देऊ शकले नाही आणि स्वस्तात माघारी परतले. तिसऱ्या टी-20 सामन्यात नियमित कर्णधार आरोन फिंचचे कमबॅक झाले पण तो भोपळाही फोडू शकला नाही. स्टीव्ह स्मिथ 24 धावांवर बाद झाला.