विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

India Tour of Australia 2020-21: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्यातील डे-नाईट कसोटी (Day/Night Test) सामन्यामध्ये प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामना पाहण्याची परवानगी देण्याची ऑस्ट्रेलिया क्रिकेटने (Cricket Australia) जाहीर केले. जगभरातील आणि विशेषत: ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान किती तिकिटं उपलब्ध असतील याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, मार्चमध्ये कोविडमुळे क्रिकेटला ब्रेक लागल्यानंतर पहिल्यांदा चाहत्यांना स्टेडियममध्ये लाईव्ह क्रिकेट पाहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानुसार अ‍ॅडलेड ओव्हलमधील (Adelaide Oval) एकूण क्षमतेच्या 50 टक्के म्हणजे एकूण 27,000 प्रेक्षकांना आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या कसोटी सामन्यात दररोज लाईव्ह सामना पाहण्याची परवानगी दिली जाईल. (India Tour of Australia 2020-21: टीम इंडियाच्या सुधारित टेस्ट संघात रोहित शर्माचा समावेश, विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परतणार)

अ‍ॅडिलेड येथे 17 ते 21 डिसेंबर दरम्यान गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळला जाईल. हा एकमेव कसोटी सामना असेल ज्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली झळकेल यानंतर बीसीसीआयने त्याची पॅटर्निटी रजा मजूर केली आहे. विराट आणि पत्नी अनुष्का यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अपत्यप्राप्ती होणार असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. शिवाय, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पाहिलांदा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे आणि या दोन्ही संघ आजवर खेळलेल्या एकही पिंक बॉल टेस्टमध्ये पराभूत झालेले नाहीत. कसोटी मालिकेपूर्वी भारत ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाईल जी 27 नोव्हेंबरपासून सुरु होईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका अधिकृतनिवेदनात म्हटले की, "भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणार्‍या बॉक्सिंग डे कसोटीत 25 टक्के प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित राहू शकतील, तर ब्रिस्बेन येथील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात 75 टक्के प्रेक्षकांना मैदानातून बसून सामना पाहता येईल." मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटीसाठी व्हिक्टोरियन सरकारने सध्या दररोज 25,000 चाहत्यांना परवानगी दिली आहे. सिडनी येथे 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वनडे सामन्यापासून दौऱ्याची सुरुवात होईल.