India Tour of Australia 2020-21: भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणाऱ्या संघात टीम इंडियाचा (India Tour of Australia) सलामी फलंदाज रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड झाली आहे. भारताच्या मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहितचा ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे, तर वनडे आणि टी-20 संघात त्याला स्थान मिळाले नाही. "बीसीसीआय (BCCI) मेडिकल टीम रोहित शर्माच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीला याबाबत माहिती दिली आहे. शर्मा यांच्याशी सल्लामसलत करून संपूर्ण कसरती परत मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे," मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रोहितला यापूर्वी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. (Wriddhman Saha Injury: ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, रिद्धिमान साहाला हॅमस्ट्रिंगचे निदान, SRH कर्णधार डेविड वॉर्नरने दिली माहिती)
रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल, अशी सोमवारी, बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असल्याची माहितीही निवड समितीने दिली आहे. कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला पुढील वर्षी जानेवारी महिन्यात अपत्यप्राप्ती होणार असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयने कोहलीला पॅटर्निटी रजा दिली आहे. अशा स्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्वात करेल.
Updates - India’s Tour of Australia
The All-India Senior Selection Committee met on Sunday to pick certain replacements after receiving injury reports and updates from the BCCI Medical Team.
More details here - https://t.co/8BSt2vCaXt #AUSvIND pic.twitter.com/Ge0x7bCRBU
— BCCI (@BCCI) November 9, 2020
याशिवाय भारतीय संघात अजूनही काही बदल झालेलं आहेत. खांद्याच्या दुखापतीमुळे फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती टी-20 मालिकेमधून बाहेर पडला असून त्याच्या जागी टी नटराजनची निवड करण्यात आली आहे. कमलेश नागरकोटी देखील ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकणार नाही कारण तो अजूनही गोलंदाजीच्या वर्कलोड व्यवस्थापनावर वैद्यकीय संघाबरोबर कार्यरत आहे. दुसरीकडे, 3 रोजी आयपीएलच्या आयपीच्या तिसऱ्या सामन्यात रिद्धिमान साहाच्या हेम्सस्ट्रिंगला दुखापत झाली आहे आणि त्याच्या उपलब्धतेवर नंतर निर्णय घेतला जाईल.