IND vs AUS Brisbane Test 2021: क्वीन्सलँड सरकार जाहीर केला नवीन तीन दिवसांचा लॉकडाउन, चौथा ब्रिस्बेन टेस्ट रद्द होण्याच्या उंबरठ्यावर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 2nd टेस्ट, एमसीजी (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS Brisbane Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याचे आयोजन अडचणीत सापडले आहे. क्वीन्सलँड (Queensland) सरकारने नवीन तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले ज्यामुळे क्विन्सलँड राज्याच्या राजधानीत भारताविरुद्ध चौथी आणि शेवटची कसोटी सामना खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Cricket Australia) प्रयत्नात अडचण निर्माण केली आहे. ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया येथील वरिष्ठ क्रिकेट मंडळाचे अधिकारी कठोर क्वारंटाइन नियमांवर चर्चा करण्यासाठी तयार झाल्याच्या 24 तासांनंतर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. "क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी पुढच्या आठवड्यात गब्बा येथे सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ब्रिस्बेन येथे तीन दिवसांच्या लॉकडाऊनचा परिणाम निश्चित करण्यासाठी त्वरित प्रयत्न करीत आहेत," PTIने वृत्तपत्राचा हवाला देत म्हटले. (IND vs AUS 2020-21: ब्रिस्बेन येथे चौथ्या टेस्टवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया बॉसचे स्पष्टीकरण, BCCI बाबत केले 'हे' विधान)

उत्तर ऑस्ट्रेलियाला जाणे आणि कडक जैवसुरक्षा प्रतिबंधामुळे यापूर्वीच भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास संकोच करत असल्याने अंतिम सामना चर्चा विषय ठरला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ब्रिस्बेनला रवाना होणार आहेत, परंतु परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन आणखी वाढवला जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे. "हॉटेल क्वारन्टाईन कामगाराची इंग्लंडमधील नवीन कोविड-19 स्ट्रेन व्हायरस टेस्ट सकारात्मक आल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ केली आहे," अव्हाळात पुढे म्हटले. क्रिकेट ऑस्ट्रेलिया 36,000 प्रेक्षकांना परवानगी देण्यास तयार असतानाही, आरोग्याच्या प्रदीर्घ परिस्थितीमुळे प्रेक्षकांच्या धोरणात बदल केले जाऊ शकते. "शहरातील आरोग्याच्या भीतीमुळे प्रेक्षकांची उपस्थितीचे धोरण संकट धोक्यात आले आहे," वृत्तपत्रात म्हटले.

दरम्यान, गुरुवारी, बीसीसीआयने ब्रिस्बेनच्या क्वारंटिन प्रोटोकॉलमध्ये विश्रांती घेण्यासाठी सीएला पत्र लिहिले आणि दौऱ्याच्या सुरुवातीला मान्य केल्यानुसार संघाच्या सुरुवातीच्या काळात कडक क्वारंटाइन पूर्ण केल्याचीही आठवण करून दिली. ब्रिस्बेनमधील क्वारंटाइन नियमांनुसार खेळाडूंना दिवसाच्या खेळानंतर फक्त त्यांच्या हॉटेलच्या खोलींमध्ये मर्यादित राहावे लागणार आहे. अशा स्थितीत, जर, ब्रिस्बेनमध्ये कसोटी सामन्याचे आयोजन न झाल्यास किंवा टीम इंडिया जाण्यास नकार देत असेल तर सिडनी हे एक बॅक अप ठिकाण असेल.