IND vs AUS 3rd Test Match Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील आपला विजयी फॉर्म कायम ठेवण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया (Team India) यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) उतरेल. अॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये 8 विकेटने पराभवानंतर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक करत मालिकेत बरोबरी केली. आणि आता दोन्ही संघ सिडनीमधील (Sydney) सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल, तर सकाळी 4:30 वाजता टॉस होईल. भारत-ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 3rd Test: एमएस धोनीची बरोबरी करण्यापासून अजिंक्य रहाणे एक पाऊल दूर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विक्रमाची संधी)
सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे धाकड सलामी फलंदाज कांगारू संघाचा डेविड वॉर्नर आणि भारताचा रोहित शर्मा संघात सामील झाला आहे. वॉर्नर आणि रोहित यांना पहिल्या दोन्ही सामन्यांना मुकावे लागले असल्याने सिडनीमधील त्यांचा मालिकेतील पहिलाच असेल. टीम इंडियाने मागील सामन्यात बॅट आणि बॉलने प्रभावी कामगिरी बजावली होती, तर कांगारू संघाने अपेक्षा भंग करत निराशाजनक खेळी केली. सिडनीमध्ये विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला पसंती दिली जात असली तरी ऑस्ट्रेलिया संघाला कमी लेखण्याची चूक रहाणे आणि संघ करणार नाही.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन:
भारत: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.
ऑस्ट्रेलिया: