IND vs AUS 3rd Test 2021: सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) तिसर्या पाचव्या दिवशी टीम इंडियाने (Team India) सर्व प्रकारच्या अडचणींचा प्रतिकार करत सामन्यात ऐतिहासिक ड्रॉ मिळवला. सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी ऑस्ट्रेलियाला (Australia) विजयासाठी 8 विकेटची गरज असताना आणि रविंद्र जडेजा, रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांच्या दुखापतींमुळे टीम इंडियाचा पराभव फक्त औपचारिकता दिसत होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आणि शेवटच्या दिवशी अवघ्या तीन विकेट गमावल्या. संघाला सामना बरोबरी सोडवण्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) यंदा फलंदाजीने महत्वपूर्ण भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाच्या खेळातील विजयाच्या आशा पल्लवित करण्यासाठी त्याने 39 धावा केल्या आणि 128 चेंडूंचा सामना केला. अश्विनची पत्नी प्रीतीने ट्विटरवरुन नवऱ्याच्या आश्वासक खेळीचे कौतुक केले आणि फिरकीपटूच्या वेदनेबद्दलही माहिती दिली. (IND vs AUS 3rd Test 2021: SCG मध्ये सॉलिड खेळीनंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसह दिग्गजांकडून टीम इंडियाला कौतुकाची थाप)
प्रीतीने म्हणले की अश्विनला रविवार रात्रीपासून पाठीला दुखापत होती. प्रीतीने लिहिले, "हा माणूस काल रात्री झोपायला गेला, एका भयानक पाठीतील हिसका आणि अविश्वसनीय वेदनेसह. आज सकाळी उठल्यावर तो सरळ उभाही राहू शकत नव्हता. त्याच्या बुटाच्या लेस बांधण्यासाठी त्याला वाकणे शक्य झाले नाही. अश्विनने आज जे काही केले ते पाहून मी चकित झालो." पहा अश्विनच्या पत्नीचे हे ट्विट:
The man went to bed last night with a terrible back tweak and in unbelievable pain. He could not stand up straight when he woke up this morning. Could not bend down to tie his shoe laces. I am amazed at what @ashwinravi99 pulled off today.
— Prithi Ashwin (@prithinarayanan) January 11, 2021
प्रीती अश्विनच्या पाठीशी!!
Wow. Keep cool Ashwinnnnnnn.
— Prithi Ashwin (@prithinarayanan) January 11, 2021
दरम्यान, तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राहिल्याने चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. आता ब्रिस्बेनच्या गाब्बा येथे मालिकेचं चौथा आणि अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना 15 जानेवारी रोजी सुरू होणार असून अनुकूल निकाल मिळवण्याच्या दोन्ही संघ निर्धारित असतील. दुखापतीमुळे रविंद्र जडेजा, रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांच्या खेळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे.