IND vs AUS 3rd Test 2021: 'ड्रॉ नाही तर हा खरा विजय'! SCG मध्ये सॉलिड खेळीनंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसह दिग्गजांकडून टीम इंडियाला कौतुकाची थाप
हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन (Photo Credits: Twitter)

IND vs AUS 3rd Test 2021: भारतीय फलंदाजांनी आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या गेलेल्या तिसरा कसोटी सामना अनिर्णित करत उत्कटता दर्शविली आहे. जगभरात त्यांचे कौतुक केले जात आहे. दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियासाठी (Team India) सामना वाचवणे कठीण होईल असे दिसत असताना हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर अश्विनने संयमी खेळी केली आणि सामना अनिर्णीत केला. चौथ्या डावात रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, विहारी आणि अश्विनने (Ashwin) ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे ते पाहून प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. आनंद महिंद्रा (Aanand Mahindra) ते टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी सोशल मीडिया अकाउंटवरून टीम इंडियाचे कौतुक केले आणि फलंदाजांना कौतुकाची थाप दिली. महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की "ड्रॉ नव्हे हा एक विजय होता.. टीम इंडियाने प्रतिकूल परिस्थितीत आणि निंद्य लोकांच्या विरोधात खिंड लढवली. ब्रावो!" (IND vs AUS 3rd Test 2021: रिषभ पंतचा तडाखा, विहारी-अश्विनच्या चिवट फलंदाजीने भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी सिडनी टेस्ट ड्रॉ)

दरम्यान टीम इंडिया माजी खेळाडूंनी देखील संघाच्या आश्चर्यकारक विजयावर प्रतिक्रिया दिली आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संघावर अभिमान व्यक्त केला.

ते एपिक होते

अशा प्रयत्नातून संघाचे वैशिष्ट्य निश्चित होते.

टीम इंडियाचा खरोखर अभिमान आहे!

उल्लेखनीय कामगिरी!

संघाचा अभिमान!

आनंद महिंद्रा 

दरम्यान, आज पाचव्या दिवशी जेव्हा टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानावर आली होती तेव्हा त्यांनी आधीच 98 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. शिवाय, दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे देखील स्वस्तात माघारी परतला. दुसर्‍या डावात रिषभ पंतने सर्वाधिक 97 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 77 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने चौथ्या डावात 5 विकेट गमावत 334 धावा केल्या. शेवटी विहारी आणि अश्विन क्रीजवर टिकून राहिले. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे.