मुंबईत खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात बाऊन्सर बॉल डोक्यावर लागल्याने युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला दुसर्या सामन्यासाठी टीम इंडियातून (India) बाहेर करण्यात आली आहे. भारतीय संघ शुक्रवारी, 17 जानेवारी रोजी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळणार आहे. मुंबई वनडे सामन्यात पंतच्या डोक्यावर मार लागला होता, ज्यामुळे तो फिल्डिंग करण्यासाठी मैदानावर आला नाही, मात्र त्याने पूर्ण फलंदाजी केली. सध्या पंतची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. चेंडू लागल्याने पंत विकेटकिपिंगसाठी मैदानात आला नाही, आणि त्याच्याजागी केएल राहुल (KL Rahul) याने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली. अशा परिस्थितीत राहुल पुन्हा विकेटकीपिंग करताना दिसेल अशी अपेक्षा आहे. मुंबईतील सामन्यात पंतला हेल्मेटवर बॉल लागला आणि कनकशनमुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले. (IND vs AUS 1st ODI: केएल राहुल ने डेविड वॉर्नर चा कॅच सोडल्यावर वानखेडेवरील चाहत्यांनी केला 'धोनी...धोनी' नावाचा जयघोष, पाहा Video)
मंगळवारी सामन्यादरम्यान पंतला मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर बुधवारी सायंकाळी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. यापूर्वी ऑस्ट्रेलियासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यासाठी पंत संघासह राजकोटला जाणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, "पंत इतर सदस्यांसह राजकोटला जाणार नाहीत. सामान्यत: ज्या खेळाडूच्या डोक्यावर बॉल लागतो त्याला 24 तास निरीक्षणाखाली ठेवले जाते." भारतीय डावाच्या 44 व्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्स याचा बाउन्सर बॉल पंतच्या हेल्मेटला लागला, आणि चेंडू फिल्डरकडे गेला, ज्याने त्याला सहज झेल पकडला आणि त्याला माघार धाडले.
दरम्यान, बेंगळुरू नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए) मधील विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली पंच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पार पडेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक निवेदन जाहीर केले असून पंत पुढील वनडे सामना खेळणार नसल्याचे पुष्टीकरण केले आहे.