IND vs AUS 2nd Boxing Day Test: यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमध्ये भारताकडून (India) शुभमन गिल (Shubman Gill) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground) वरील सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या दिवसाच्या दोन्ही सत्रात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आणि ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत पाठवला. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने आक्रामक डावपेच वापरले आणि कांगारू संघावर दबाव कायम ठेवला. अडखळत्या सुरुवातीनंतर मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) आणि ट्रेव्हिस हेड यांच्या अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला, पण भारताचे पदार्पणवीर शुभमन आणि सिराज यांनी एकत्र येत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. (IND vs AUS 2nd Test Day 1: मार्नस लाबूशेनची एकाकी झुंज, सिराजला मिळाली पहिली टेस्ट विकेट; Tea पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 136 धावा)
सिराजने घातक ऑस्ट्रेलियन फलंदाज लाबूशेनला शुभमनकडे झेलबाद करत संघाला मोठा दिलासा दिला. सिराजचा चेंडू लाबूशेनने फ्लिक केला आणि शुभमनने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर उडी मारत हवेत झेल पकडला. अशाप्रकारे भारताच्या पदार्पणवीरांनी संघाला यश मिळवून दिलं. विशेष म्हणजे लाबूशेन आंतरराष्ट्रीय कसोटीमधील सिराजचा पहिला शिकार ठरला तर गिलचा देखील पहिला कसोटी झेल ठरला. मॅथ्यू वेडेचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात यापूर्वी गिल आणि रवींद्र जडेजा यांची टक्कर झाली होती. हा झेल जडेजाच्या हाती लागला. पहिल्या सत्रात एकही विकेट न मिळालेल्या सिराजला दुसऱ्या सत्रातील 50व्या ओव्हरमध्ये पहिले यश मिळाले. पाहा व्हिडिओ:
A moment Mohammed Siraj will never forget - his first Test wicket! #OhWhatAFeeling @Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/1jfPJuidL4
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
चहाच्या वेळेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने पाच विकेट गमावून 136 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. यापूर्वी, अॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 विकेटने विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.