IND vs AUS 2nd Test Day 1: भारताविरुद्ध (India) बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) दुसऱ्या सत्रात मार्नस लाबूशेनच्या (Marnus Labuschagne) एकाकी लढतीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रलिया संघाने (Australian Team) जबरदस्त कमबॅक केलं आणि Tea च्या वेळेपर्यंत 5 विकेट गमावून 136 धावा केल्या. लाबूशेनने 48 धावा केल्या. कर्णधार टिम पेन नाबाद 0 आणि कॅमरुन ग्रीन नाबाद 6 धावा करून खेळत आहेत. लंचपर्यंत 65 धावांवर 3 विकेट गमावणाऱ्या दुसऱ्या सत्रापर्यंत लाबूशेन आणि ट्रेव्हिस हेडने संयमी फलंदाजी करतकांगारू संघाला शंभरी पार करून दिली. संघाची आघाडीची फळी स्वस्तात माघारी परतल्यावर लाबूशेनने 86 धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. हेड 38 धावा करून माघारी परतला. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 तर पदार्पणवीर मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) 1 विकेट मिळाली. सिरीजने घातक लाबूशेनला माघारी धाडलं. (Ashwin Dismisses Steve Smith For Duck at MCG: बॉक्सिंग डे टेस्टमध्ये स्टिव्ह स्मिथवर नामुष्की, अश्विन 'ही' कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज)
दरम्यान, टॉस गमावून गोलंदाजी करत भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे टेस्टची आश्वासक सुरुवात केली आणि पहिल्या सत्रात तीन कांगारू फलंदाजांना माघारी धाडलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण बुमराहने तिसऱ्याच ओव्हरमध्ये कांगारुंना धक्का देत सलामी फलंदाज जो बर्न्सला माघारी धाडलं. यानंतर मॅथ्यू वेड आणि लाबुशेनने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतू अश्विनने सलग दोन झटके देत भारताला कांगारुंवर वर्चस्व मिळवून दिलं. आश्विनने पहिले वेडला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि पाठोपाठ स्टिव्ह स्मिथही आश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी परतला. त्यामुळे सुरुवातीच्या सत्रातच तीन कांगारू शिलेदार माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला, पण लाबूशेन-हेडच्या जोडीने पुढे डाव सांभाळला.
लंचनंतर हेड आक्रामक फलंदाजी करत असताना बुमराहने त्याला रहाणेकडे कॅच आऊट करत जमलेली जोडी मोडली. यानंतर सिराजने धोकादायक लाबूशेनला 48 धावांवर बाद केलं आणि आंतरराष्ट्रीय टेस्टमधील आपली पहिली विकेट साजरी केली. सुरजच्या चेंडूवर लाबूशेन शुभमन गिलकडे झेलबाद होऊन माघारी परतला.