IND vs AUS 2020: टीम इंडियाविरुद्ध 'बॉक्सिंग डे' टेस्ट मेलबर्नच्या MCG बाहेर स्थानांतरित होण्याची शक्यता, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने व्यक्त केली चिंता
विराट कोहली आणि टिम पेन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसह (Photo Credit: Getty)

वर्षाखारीस भारतीय संघाचा (Indian Team) ऑस्ट्रेलिया (Australia) दौरा निश्चित झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात टी-20 मालिकेची सुरुवात होणार असून डिसेंबर महिन्यात कसोटी आणि नंतर जानेवारीमध्ये वनडे मालिका खेळली जाईल. या दौऱ्यावर पहिल्यांदा दोन्ही टीममध्ये डे-नाईट कसोटी सामनाही खेळला जाणार आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याला वेगळीच चिंता सतावत आहे. व्हिक्टोरियातील (Victoria) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध 'बॉक्सिंग डे' कसोटी (Boxing Day Test) सामना मॅलबर्न क्रिकेट ग्राउंडबाहेर (Melbourn Cricket Ground) स्थानांतरित केले जाऊ शकतो अशी पेनला चिंता लागली आहे. व्हिक्टोरियामध्ये वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 'बॉक्सिंग डे' परिस्थिती नियंत्रणात असलेल्या पर्थ येथे हलविण्याच्या विचारात क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) विचार करीत आहे. "निश्चितच, एखाद्या खेळाडूच्या दृष्टीकोनातून, आम्हाला सर्वोत्तम ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांसमोर खेळण्याची इच्छा आहे आणि 'बॉक्सिंग डे'सारखा मोठा दिवस म्हणजे प्रत्येकजण उत्सुक असतो आणि त्यातील एक मोठा भाग MCG मध्ये खेळत आहे," सीए वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओ मेसेजमध्ये कीपर-फलंदाज म्हणाला. (विराट कोहलीच्या बॅटिंगची डेविड वॉर्नरला वाटते भीती, म्हणे-'कोहलीला स्लेज करणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे एकसारखे')

दरम्यान, जर सामना पर्थ येथे स्थलांतरित केला गेला तर तो ऑप्टस स्टेडियममध्ये आयोजित केला जाऊ शकतो जेथे 60,000 प्रेक्षक उपस्थित राहू शकतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये MCG बाहेर सर्वोत्कृष्ट ठिकाण मानले जात आहे. शिवाय, त्यावेळची परिस्थिती पाहून सामना मेलबर्नच्या रिक्त स्टेडियममधेही आयोजित केला जाऊ शकतो असेही वृत्त समोर येत आहे. मात्र, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना त्यांच्या पारंपरिक ठिकाणी एमसीजी येथे होईल अशी पेनने व्यक्त केली.

तो म्हणाला, “सद्य परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की सर्व काही व्यवस्थित व सुव्यवस्थित आहे. आम्ही आशा करतो की आगामी उन्हाळी हंगामात आम्ही जिथे जिथे खेळतो तिथे प्रेक्षकांना येण्याची परवानगी असेल." भारत-ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची मालिका पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार 2 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होईल. तथापि, तोपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी झाला नाही, तर भारतीय खेळाडूंना जैव-सुरक्षित वातावरणात ठेवता येईल आणि संपूर्ण मालिका एकाच मैदानावर आयोजित केली जाऊ शकते.